राजकारणात असलो तरी कधी मंत्री व्हावं असं वाटलं नाही… का म्हणाले असे संजय राऊत?


पुणे–राजकारणात असलो तरी कधी मंत्री व्हावं असं वाटलं नाही. कारण, मला केंद्रीय मंत्री होण्यापेक्षा सामनाचा संपादक असणं महत्वाचं होतं’, असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी केलं.

 पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ज. स. करंदीकर स्मृती व्याख्यानमालेतते  बोलत होते. बदलत्या परिस्थितीत प्रसार माध्यमांपुढील आव्हाने या विषयावर राऊत यांनी आपली भूमिका मांडली.

भाषिक वृत्तपत्र देशाचा राज्याचा आधार आहेत. राजकारणात असलो तरी कधी मंत्री व्हावं अस वाटलं नाही. कारण, मला केंद्रीय मंत्री होण्यापेक्षा सामनाचा संपादक असणं महत्वाच होतं. मी संपादक झालो तेव्हापर्यत कधीच अग्रलेख कधीच लिहला नव्हता. सामान्य माणसाची व्यथा मांडतो म्हणजे राजकारणच आहे. कुमार केतकर हे बाहेर भूमिका मांडूनच राज्यसभेत गेले. पण ते तिकडे गेल्यावर सोनिया गांधी यांची भूमिका मांडताना ते दिसत नाहीत. त्यामुळे भूमिका मांडत राहील पाहिजे, जी आम्ही मांडतो, असा सल्लाही राऊतांनी केतकरांना दिला.

अधिक वाचा  MLA disqualification case Result : एकनाथ शिंदेंचीच शिवसेना खरी शिवसेना : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला  उद्धव ठाकरे यांना धक्का देणारा निर्णय

पत्रकारांनी राजकीय पक्षाचे अंकित होता कामा नये. पत्रकारितेत काही पथ्य पाळली पाहिजेत. देशात जे परिवर्तन झालं ते वृत्तपत्रांनी केलं यावर मी ठाम आहे. आता अनेक आव्हानं आहेत. चौथा स्तंभ म्हणता पण त्यांना संसदेत येण्यास नाकारलं जात आहे. यावर कुणी आवाज उठवताना दिसत नाही. यावर पत्रकारांमध्ये एकजूट हवी. भविष्यात असे काही दिसते की राज्यकर्ते माध्यमांना आपल्यासारखं वागवतील आणि ते वाईट आहेत, असंही राऊत म्हणाले.

इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये 72 तासात कुठल्याही क्षणी आर्यन खान बाहेर येईल अशी बातमी चालवली गेली. यात काहीही दाखवलं जातं. ते कधीही पाहिलेलं नसतं. शेतकरी, महागाई असे अनेक विषय आहेत. पण आर्यन खानची बातमी आल्यानंतर इतर बातम्या निघून जातात. मग सामान्य माणसांनी का बातम्या बघायच्या किंवा वाचायच्या? असा सवालही राऊत यांनी माध्यमांना केला.

अधिक वाचा  मोहन भागवतांच्या विधानाने माझ्या ज्ञानात भर पडली- शरद पवार

कुठल्याही सरकारला आपल्या मर्जीतील वृत्तपत्र नसेल तर ते नको आहे. उत्तर प्रदेशात कोरोनाकाळात मृतदेहांचे फोटो एका वृत्तपत्राने दाखवले. तेव्हा त्याच्यावर आठ दिवसांत धाडी टाकण्यात आल्या. मग त्यावेळी त्यांच्या पाठीशी कोण उभं राहिलं? देशातील मीडिया उद्योजकांच्या हाती जातेय. मात्र, वृत्तपत्रांशिवाय सरकार आणि सरकारशिवाय वृत्तपत्र शक्य नाही. आजची पिढी लिहायला, कागदाला पेन लावायला विसरली आहे. हेच मोठं आव्हान असणार आहे, अशी खंत व्यक्त करतानाच मीडियाला माझ्यामुळे काम मिळतंय. समाजात आणि देशात क्रांती घडवून आणण्याची ताकद वृत्तपत्रात असल्याचा विश्वासही राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love