संस्कृती प्रतिष्ठान आणि मिती इंफोटेनमेंट ह्यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दुर्गोत्सवा’ची घोषणा : नागरिकांना सहभाग घेण्याचे महापौरांचे आवाहन

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे-संस्कृती प्रतिष्ठान आणि मिती इंफोटेनमेंट ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पुण्याचे महापौर  मुरलीधर मोहोळ ह्यांच्या संकल्पनेतून एक अभिनव आणि सर्वसमावेशक अशा ‘दुर्गोत्सवा’ची घोषणा करण्यात आली. हा उपक्रम लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून आखलेला असला तरी ह्यात सहभागासाठी वयाचे कसलेही बंधन नाही.  सर्व वयोगटातील नागरिकांना ह्यामध्ये उत्साहाने सहभाग घेण्याचे आवाहन  यावेळी करण्यात आले. या उपक्रमाचा मूळ उद्देश हा आपले संस्कृती संवर्धन हा असणार आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ, मीती इन्फोटेनमेंटचे व्यंकटेश मांडके, अनिरुद्ध राजदेरकर, शंतनू कुलकर्णी हे  यावेळी उपस्थित होते .  

दुर्गोत्सवाबद्दल अधिकची माहिती देताना मुरलीधर मोहोळ म्हणाले की,  पुण्यातील नागरिकांचे सर्वप्रथम खूप आभार की आपण ह्या करोनाच्या भयावह महामारीच्या काळात एकमेकांना साथ देत, त्यातून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलो आहोत. मला वाटतं आता वेळ आली आहे ती  आपण साऱ्यांनी मिळून एका सर्वसमावेशक अशा सांस्कृतिक उपक्रमाला सुरुवात करण्याची.  मीती इन्फोटेनमेंट आणि संस्कृती प्रतिष्ठनातर्फे आपण आपल्या शहरातील  मुलांसाठी दुर्गोत्सवाची संकल्पना राबवित आहोत. ह्यामध्ये शहरातील साऱ्या मुलांनी भाग घ्यावा असे आवाहन मी या ठिकाणी करतो. सगळे कुटुंबप्रमुख, लोकप्रतिनिधी आणि वेगवेगळी प्रसारमाध्यमे  ह्या उपक्रमासाठी सहकार्य करतील ह्याचा मला विश्वास आहे. मी ह्या ठिकाणी मिती इन्फोटेनमेंटच्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानतो तसेच “टीम मावळा”ला देखील शुभेच्छा देतो!

उपक्रमाबाबत पुढे बोलताना मिती इंफोटेनमेंटचे अनिरुद्ध राजदेरकर म्हणाले की आम्ही ह्या अभिनव संकल्पनेला यशस्वीरीत्या राबवण्यासाठी कमालीचे उत्सुक आहोत.  आपण मोठी माणसे वेगवेगळ्या कारणांसाठी एकत्र येतच असतो.  असे उपक्रम आपल्या घरांतील मुलांसाठी क्वचितच आयोजित केले जातात. त्यात करोनाच्या काळात तर लहान मुलांना त्यांच्या मनासारखे काहीच करता आले नव्हते.  दुर्गोत्सव ह्या उपक्रमामधून आमची अशी अपेक्षा आहे की लहान मुलांना मध्यवर्ती ठेऊन योजलेल्या ह्या अभिनव उपक्रमात सहभागी होण्यासाठी सारे मदत करतील.

कसा नोंदवाल दुर्गोत्सवात आपला सहभाग?

हाऊसिंग सोसायटींमध्ये ते आपल्या घरातल्या गॅलर्‍यांमध्ये साऱ्यांनी आपल्या पाल्यांना घेऊन दुर्ग बनवावेत कल्पकतेने त्याला सजवावे , त्यावर चित्र ठेवावीत  आणि त्याचे फोटो www. themawala . com वरील दुर्गोत्सवाच्या संकेतस्थळावर जाऊन वेगवेगळ्या बाजूंनी ३ फोटो अपलोड करत आपला सहभाग नोंदवावा. ३ मधील एक फोटो हा दुर्ग बनविणाऱ्यांसोबत असावा . पूर्वनियोजित संकेतस्थळावर टाकावेत. पुणे शहरात घोषित केलेल्या ह्या उपक्रमास भौगोलिक सीमेच्या काहीच मर्यादा  नाहीयेत. हा  उपक्रम २ नोव्हेंबर २०२१ पासून २० नोव्हेंबर २०२१ पर्यंत फोटो अपलोड करण्यासाठी खुला असेन अभिनव प्रयत्नांना माध्यमांतून प्रसिद्धी मिळावी, सहभागींचे कौतुक व्हावे असा ह्या उपक्रमाचा उद्देश आहे.

दुर्गोत्सव २०२१ मध्ये सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही आणि ह्या उपक्रमाचा मूळ उद्देश हा आपल्या शहरातील लहानग्यांचा ह्या अनोख्या उपक्रमामध्ये सहभाग हा आहे. सदर उपक्रम हा एक स्पर्धा नसून एक मोहीम, एक चळवळ म्हणून घोषित करण्यात येत आहे.  सहभागी होणाऱ्या साऱ्यांनाच डिजिटल स्वरूपाचे स्तुतिपत्र देण्यात येईल.

पुणे शहर हे शिवजन्मोत्सव आणि गणेशोत्सव ह्या सारख्या सार्वजनिक सोहळ्यांचे उगमस्थान आहे. येथे त्याच धरतीवर शहरातील छोट्या नागरिकांसाठी अशीच एखादी सर्वसमावेशक मोहीम सुरु करण्याचा उद्देश ह्या दुर्गोत्सवातून साधला जावा अशी अपेक्षा आहे. हा उपक्रम लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवून आखलेला असला तरी ह्यात सहभागासाठी वयाचे कसलेही बंधन नाही. साऱ्याच नागरिकांना ह्यामध्ये उत्साहाने सहभाग घेण्याचे आवाहन केले जात आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *