मला तशी नौटंकी जमत नाही; का म्हणाले असे अजित पवार?


पुणे(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जसे त्यांच्या सडेतोड स्वभावाने परिचित आहेत तसेच ते कधी-कधी मिश्कील टिप्पणी करत विनोद करण्यातही माहीर आहेत. याची प्रचीती अनेकदा पत्रकारांना त्यांना प्रश्न विचारल्यानंतर येते. आज पुण्यातही असाच किस्सा घडला आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

सध्या देशात आणि राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनावरची लस आल्यानंतर नागरिकांबरोबरच पंतप्रधानांपासून अनेक राजकीय नेत्यांनी लस घेतल्यानंतर लस घेतानाचे त्यांचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. अजित पवार यांनी आज पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी पत्रकारांनी त्यांना तुम्ही लस घेतली का? असा प्रश्न विचारला त्यावर त्यांनी लसीचा पहिला डोस घेतल्याचे सांगितले. मात्र, लस घेतानाचा फोटो काढला नाही, मला तशी नौटंकी जमत नाही असे सांगत इतरांनी लस घेतल्याचे फोटो टाकले तर त्यांचे फोटो बघून इतर लस घेतील मात्र, मी लस घेतानाचे माझे  फोटो टाकले तर कोणी लस घेणार नाही अशी टिप्पणी त्यांनी केली आणि एकच हशा पिकला.  

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  #Pankaja Munde On Murlidhar Mohol: पुण्याच्या सेवेसाठी मुरलीधर मोहोळ हक्काचे खासदार असतील - पंकजा मुंडे