धक्कादायक : पोटच्या ११ वर्षाच्या मुलाला दोन वर्षापासून तब्बल २२ कुत्र्यांसोबत एका रूममध्ये ठेवले डांबून

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

पुणे– पोटच्या ११ वर्षाच्या मुलाला दोन वर्षापासून तब्बल २२ कुत्र्यांसोबत एका रूममध्ये डांबून ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन वर्षांपेक्षा जास्त काळ कुत्र्याच्या पिलांच्या सहवासात बंदिस्त राहिल्यामुळे हा मुलगा आपण माणूस आहोत हेच विसरून गेला आहे. पुण्यातल्या कोंढवा परिसरातल्या कृष्णाई बिल्डिंगमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी आई वडिलांविरोधात बालन्याय ( मुलांची काळजी व संरक्षण ) अधिनियम सन २०० चे कलम २३, २८ प्रमाणे कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय लोधरिया आणि शितल लोधरिया असे आरोपी आई वडिलांची नावे आहेत. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरातील कृष्णाई इमारतीमध्ये संजय लोधरिया आणि शितल लोधरिया राहतात आहे. ते राहत असलेल्या घरात २० ते २२ कुत्री आहेत. त्या घरातून खूप वास येत आहे. कुत्री असलेल्या खोलीत ११ वर्षाचा मुलगा जवळपास दोन वर्षापासून राहत आहे. तो मुलगा खिडकीत बसतो आणि कुत्र्यासारखे वर्तण करतो. चाईल्ड लाईन संस्थेच्या समन्वयक अपर्णा मोडक यांना एकाने फोनवरून याबाबत माहिती दिली.

त्या माहितीच्या आधारे त्यांनी तिथे जाऊन पाहणी केली. तेव्हा एका रुममध्ये ११ वर्षाचा मुलगा होता आणि त्याच्या आजूबाजूला विविध वयोगटाची २० ते २२ कुत्री आढळून आली. तो मुलगा बेडवर झोपलेल्या अवस्थेत होता. त्यावेळेस अपर्णा मोडक यांनी मुलाच्या आईवडिलांना अशाप्रकारे मुलाला ठेवल्यास त्याच्या आरोग्याला धोका पोहचू शकतो, असे सांगत मुलाच्या आरोग्याबाबत जनजागृती केली आणि ते निघून गेल्या. मात्र, काही दिवसांनी जाऊन पाहिले असता परत तोच प्रकार दिसून आला. त्यानंतर मोडक यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणी आरोपी वडील आणि आई यांची चौकशी सुरू आहे. तसेच त्या मुलाचे समुपदेशन करण्यात येत असल्याचे कोंढवा पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित लहान मुलाची त्या घरातून सुटका करणं खरोखर कठीण काम होतं. कारण ती सर्व कुत्री भटकी होती. त्यांची नसबंदी झालेली नव्हती. शिवाय ती केव्हाही हिंस्र रूप धारण करू शकत होती. घरामध्ये सर्वत्र प्राण्यांनी घाण केलेली होती. अशा अस्वच्छ ठिकाणी तब्बल २२ कुत्र्यांच्या सान्निध्यात हा ११  वर्षांचा लहान मुलगा अडकलेला होता. प्राण्यांना आणि लहान मुलांना अशा अस्वच्छ स्थितीत ठेवणं हा गुन्हा आहे. मुलाच्या पालकांनी कुत्र्यांना घरात ठेवण्याची परवानगी घेतली होती का, याचा तपास पोलीस करत असून बालकल्याण समितीच्या निर्णयानंतर या जोडप्याला अटक केली जाणार आहे.

मुलासोबत घरातून रेस्क्यू केलेल्या कुत्र्यांना डॉग शेल्टरमध्ये नेण्यासाठी पोलिसांनी महानगरपालिकेशी पत्रव्यवहार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा आणि त्याचे पालक कोंढव्यातल्या कृष्णाई बिल्डिंगमधल्या वन बीएचके अपार्टमेंटमध्ये राहत होते. त्याच घरामध्ये कुत्र्याची २२ पिल्लंदेखील होती. कित्येक दिवसांपासून हा पीडित लहान मुलगा कुत्र्यांच्या सहवासात राहत होता. त्यामुळे त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. ही गोष्ट सोसायटीतल्या एका जागरूक रहिवाशाच्या लक्षात अल्यानंतर त्याने चाइल्डलाइन फाउंडेशनला कॉल केला आणि त्यांना मुलाच्या दुर्दशेबद्दल माहिती दिली. या तक्रारीवर कारवाई करून फाउंडेशनशी संबंधित सामाजिक कार्यकर्त्यांनी ४ मे रोजी अपार्टमेंटला भेट दिली. मुलाच्या आई-वडिलांची तोंडी कानउघडणी करून समाजसेवक निघून गेले. मात्र दुसऱ्या दिवशी मुलाची प्रकृती पाहण्यासाठी पुन्हा ते संबंधित घरी गेले असता घराला बाहेरून कुलूप लावलेलं दिसलं. त्यांनी खिडकीतून आतमध्ये पाहिलं तेव्हा तो लहान मुलगा कुत्र्यांच्या कळपामध्ये एकटाच बसल्याचं आढळलं. त्यानंतर बालकल्याण समितीला याची माहिती देण्यात आली होती.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *