gtag('js', new Date());
कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्कर सज्ज
पुणे(प्रतिनिधी)-- लष्कराचे शिस्तबद्ध संचलन, सुखाई लढाऊ विमानांच्या चित्तथरारक कसरती आणि भारतीय सैन्यदलाच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘बॉम्बे सॅपर्स' या लष्करी संस्थेच्या मैदानावर बुधवारी भव्यदिव्य कार्यक्रम पार पडला. भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी परेडची पाहणी करत सैनिकांची मानवंदना स्वीकारली. दरम्यान, कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी लष्कर सज्ज असल्याचा इशारा भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी या वेळी बोलताना दिला.बीईजी...
वाल्मीक कराडचा पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅट सील
पुणे(प्रतिनिधी)-- बीडमधील  मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) गुन्हा दाखल झालेल्या वाल्मीक कराडचा वाकड येथील फ्लॅट सील करण्यात येणार आहे. या फ्लॅटचा दीड लाखांचा मालमत्ता कर थकला आहे.वाकड येथील पार्क स्ट्रीट गृहनिर्माण सोसायटीच्या आयव्हरी इमारतीच्या सहाव्या मजल्यावर 601 क्रमाकांचा वाल्मीक कराड आणि त्याची पत्नी मंजली कराड यांची सदनिका आहे. 16 जून...
झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या वेशात सोसायटीतील बंद सदनिकांची रेकी करुन घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक
पुणे(प्रतिनिधि)—झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयच्या वेशात सोसायटीतील बंद सदनिकांची रेकी करुन घरफोडी करणाऱ्या चोरट्याला, त्याचा साथीदार सराइत गुंडाला आणि सराफ व्यावसायिकाला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ८६० ग्रॅम सोन्याचे दागिने, साडेतीन किलो चांदी, १५० हिरे, दुचाकी, दोन पिस्तुलांसह पाच काडतुसे असा ८० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.याप्रकरणी गणेश मारुती काठेवाडे (वय ३७, रा. मुखेड, जि. नांदेड), सुरेश बबन पवार (वय ३५,...
एसएफए बास्केटबॉल स्पर्धेत’ ध्रुव ग्लोबलला कांस्यपदक
पुणे : एसएफए यांच्या कडून आयोजित शालेय स्तरावरील ‘एसएफए बास्केटबॉल स्पर्धेत’ नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या अंडर ११ टीम ने आपल्या पूलमधील सर्व सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला.आणि  एकतर्फी पराभव करून आपले वर्चस्व सिद्ध केले. संघाने कांस्यपदकाच्या लढतीत यजमान (४)आणि (१४)असा पराभव करून पदक जिंकले. खेळाडूंनी मिळवलेल्या यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे संचालक यशवर्धन मालपाणी आणि प्राचार्या संगीता राऊतजी...
एमआयटी डब्ल्यूपीयूत ‘उद्यमोत्सव’ १६ जानेवारी रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनाचा भव्य उत्सव
पुणे : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेल आणि एआयसीटीई यांच्यातर्फे आयोजित ‘उद्योमोत्सव २०२५’ ची घोषणा करण्यात आली आहे. या उत्सवाचे उद्घाटन १६ जानेवारी २०२५ रोजी कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या कॅम्पस मध्ये सकाळी ९.३० वा. होणार आहे. अशी माहिती एमआयटी टीबीआयचे संचालक व माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक प्रा. प्रकाश जोशी, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद...
वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर दोन कोटीची प्रॉपर्टी
पुणे(प्रतिनिधि)--बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या प्रकरणातील संशयित आणि खंडणी प्रकरणातील आरोपी असलेल्या वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावर दोन कोटी रुपयांची ॲाफिसची जागा विकत घेतल्याचं समोर आलं आहे.बीड सरपंच हत्या प्रकणाच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी मोर्चा निघत आहे. असाच एक मोर्चा पुण्यातही निघाला होता. यावेळी सुरेश धस यांनी वाल्मिक कराड यांचे दुसरे पत्नी...