gtag('js', new Date());
महाराष्ट्र ज्यूदो संघटने तर्फे आयोजित राष्ट्रीय कॅडेट स्पर्धत हरयाणा संघाला सर्वसाधारण विजेतेपद तर मणिपुर संघाला उपविजेतेपद
पुणे(प्रतिनिधि)-- पुनित बालन ग्रुप आणि इन्स्पायर स्पोटर्स इन्स्टिट्यूट प्रस्तुत महाराष्ट्र ज्यूदो संघटने तर्फे आयोजित राष्ट्रीय कॅडेट स्पर्धेत हरयाणा संघाने ४ सुवर्णपदक आणि ५ कांस्यपदक मिळवत सर्वसाधारण विजेतेपद मिळवले तर, मणिपुर संघाने ४ सुवर्णपदक आणि १ कांस्यपदक मिळवून उपविजेतेपदक मिळवले. महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातील श्रावणी डिके हिने ५७ किलोखाली गटात रौप्यपदक तर, ठाणेच्या इरा माकोडे हिने रौप्यपदक मिळवले.बालेवाडी-म्हाळूंगे येथील श्री शिवछत्रपती...
सांगली येथे शासन सहभागाने ज्यूदो खेळाचे निपुणता केंद्र उभारणार
पुणे(प्रतिनिधि)--पुनीत बालन ग्रुप यांच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र असोसिएशनच्या मदतीने सांगली येथे ज्यूदो खेळाचे खेळाडू निपुणता केंद्र उघडण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील असे अभिवचन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी कॅडेट गटाच्या राष्ट्रीय ज्यूदो स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी दिले.पाटील पुढे म्हणाले की देशाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये खेळ आणि खेळाडूंचा उत्कर्ष व्हावा यासाठी मोदी सरकार प्रयत्नशिल आहे. यासाठी खेळाडू आणि खेळांच्या...
स्व. राज कपूर यांची जन्मशताब्दी व भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृतीला सांगितिक अभिवादन
पुणे(प्रतिनिधि)--: माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एमआयटी आर्टस्, डिझाईन अँड टेक्नॅालॅाजी युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वंदन भारतमातेला’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम प्रजासत्ताक दिन म्हणजेच २६ जानेवारी रोजी सायं. ४.३० वा. राजबाग लोणी काळभोर येथील संत ज्ञानेश्वर-संत तुकाराम महाराज विश्वशांती घुमटाच्या प्रांगणात होईल. ७०० हून अधिक गायक व वादकांद्वारे संगीत मानवंदनेचा कार्यक्रम असेल. अशी माहिती...
एसएफए फुटबॉल टूर्नामेंट’ मध्ये ध्रुव ग्लोबल स्कूल ३र्‍या स्थानावर
पुणे(प्रतिनिधि) : एसएफए फुटबॉल टुर्नामेंटमध्ये नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या फुटबॉल खेळाडूंनी विजयाने सुरुवात केली.   शिवछञपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे झालेल्या एकतर्फी सामन्यात ध्रुव ग्लोबल स्कूलच्या खेळाडूंनी लॉयोला हायस्कूलवर २-० च्या विजयासह तिसर्‍या स्थानासाठी सामना जिंकला. खेळाडू आरव चौधरी व श्रीजन वर्मा यांनी गोल केला. ध्रुवच्या खेळाडूंनी प्रेक्षकांना ही विजयाची भेट देऊन टाळ्यांचा कडकडाट केला. खेळाडूंचा जोश आणि चिकाटी...
थायलंडमधील फुकेत शहरामध्ये 'दगडूशेठ' गणपतीची प्रतिष्ठापना
पुणे : जगभरातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची प्रतिकृती थायलंड मधील गणेश भक्तांनी हुबेहूब मंदिर स्वरूपात साकारली आहे. याच मंदिरात नुकतीच 'दगडूशेठ' बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांच्या हस्ते प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली.थायलंड मधील उद्योजिका व फुकेत नाइन रिअल इस्टेट कंपनीच्या चेअरमन पापासोर्न मीपा या निस्सीम...
8th Youth Parliament in Pune for strong politics, strong India
पुणे : युवा शक्तीला योग्य गती व दिशा देऊन समाजकारण आणि राजकारणामध्ये त्यांचे अधिष्ठान निर्माण करण्याकरीता तसेच सशक्त युवा, सशक्त राजकारण व सशक्त भारताकरीता तरुणाईने पुढाकार घ्यावा, याकरिता पुण्यामध्ये आठव्या युवा संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्, पुणे तर्फे गुरुवार, दिनांक ३० व शुक्रवार, दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६...