gtag('js', new Date());
संतोष देशमुख हत्या प्रकरण
पुणे(प्रतिनिधि)— बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासंदर्भात ज्यांनी आंदोलने केली, त्यांनी ही केस कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आऱोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी केला.  दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना कंट्रोल करण्यासाठी भाजपा आमदार सुरेश धस यांना पुढे करण्यात आले त्यानंतर आता मात्र भाजपने धसांचाच पत्ता कापला असल्याचं समोर आलं आहे असेही...
'छावा' चित्रपटावरुन राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता
पुणे(प्रतिनिधि)--छावा चित्रपटात सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली कान्होजी आणि गणोजी राजेशिर्के यांना खलनायक केलं. त्यामुळे राजेशिर्के घराण्याची बदनामी  झाली. ही बदनामी खपवून घेतली जाणार नाही. या चित्रपटातील हा मजकूर काढून टाकवा आणि पुन्हा प्रदर्शित करावा अन्यथा आम्ही सगळ्या शहरातून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करू, असा इशारा राजेशिर्के यांच्या वंशजांनी शुक्रवारी पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत दिला. त्यामुळे लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' चित्रपटावरुन राज्यात नव्या...
harshavardhan sapkal
पुणे(प्रतिनिधि)—आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनंतर आता काँग्रेसनेही कंबर कसली आहे. लोकसभेतल्या यशानंतर विधानसभेला सपाटून मार खाल्ल्याने अगोदरच निष्प्रभ झालेल्या पुणे शहर कॉँग्रेसमध्ये हर्षवर्धन सपकाळांसारखा नेता प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर थोडी उर्जितावस्था आल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी विधानसभा निहाय निरीक्षक...
उद्यापासून दहावीची परीक्षा सुरू
पुणे(प्रतिनिधि) - राज्यातील नऊ विभागातील ५ हजार मुख्य केंद्रांवर उद्यापासून (दि. २१) इयत्ता दहावीची  अंतिम परीक्षा  सुरू होणार आहे. राज्यातील एकूण १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थी ही परीक्षा देणार असून ही संख्या गतवर्षीच्या तुलनेत २ हजार १६५ ने जास्त आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.राज्य शिक्षण...
शिव छत्रपतींचे जन्मस्थान शिवनेरी हे राष्ट्रीय स्मारक व्हावे
पुणे - हिंदूस्थानचे अराध्य दैवत, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करून “रयतेच्या जनकल्याण राज्य व्यवस्थेची” स्थापना केली. त्याप्रमाणेच सत्ता पक्षाने, शिवाजी महाराजांना अपेक्षीत ‘रयते प्रती, महीला-भगींनींप्रती, सुरक्षा पुरवुन व बळीराजा शेतकऱ्यांप्रती  त्यांच्या पिकास योग्य भाव देण्याचा व राजकीय उत्तरदायीत्वाचा कृतीशील राजधर्म निभवण्याची आज गरज आहे. तरच ते शिव छत्रपतींना खरोखरचे अभिवादन व खरी सुमनांजली ठरेल अशी अपेक्षा काँग्रेस...
अन्नब्रम्ह पुरस्कार
पुणे : अन्न हे पूर्णब्रह्म असून अन्न तयार करणाऱ्याच्या कामाचा व ते सामाजिक दृष्टीकोनाची जोड देऊन विक्री व्यवसायाच्या कष्टाचा सन्मान होतोय ही आनंदाची बाब आहे. संविधानाला जात धर्म नसतो, तसा अन्नालाही जात धर्म नसतो. अन्नदानाची सात्विक भावना ही मानवतेची आहे. समाजीक बेबनाव, क्रुरता व असुरक्षा रोखण्या करीता सात्विक आहार, आचार व विचारांच्या परंपरेतून ‘नैतीक मुल्याधारीत, संवेदनशील समाज निर्माण होणे...