gtag('js', new Date());
Vice Sarpanch of Shivapur Gram Panchayat
पुणे - शिवापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अँड.मोनिका प्रितेश चांडगे यांची गुरुवारी बिनविरोध निवड करण्यात आली.निवडणुकीच्या वेळी पॅनल मधील प्रत्येकाला कालावधी ठरवून दिल्याप्रमाणे या अगोदरचे उपसरपंच राजेंद्र सट्टे यांनी राजीनामा दिला होता. रिक्त झालेल्या उपसरपंचपदासाठी गुरुवारी निवडणूक झाली. त्यासाठी  अँड.मोनिका प्रितेश चांडगे यांचा एकमेव अर्ज आला. त्याला शिवापूर ग्राम पंचायतीच्या सर्व सदस्यांनी त्यास मंजुरी दिली. त्यामुळे  अँड.मोनिका प्रितेश चांडगे यांची शिवापूर...
चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युट तर्फे 9 व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदेचे पुण्यात आयोजन
पुणे : चेलाराम डायबेटिस इन्स्टिट्युट तर्फे पुण्यात जे.डब्ल्यू.मॅरिएट येथे 7 ते 9 मार्च 2025 दरम्यान 9 व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषद - 2025 (इंटरनॅशनल डायबेटिस समिट) चे आयोजन करण्यात आले आहे. मधुमेह आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या मधुमेहाच्या धोक्याचा व गुंतागुंतींचा सामना करण्यासाठी योग्य उपाययोजना जाणून घेण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.या परिषदेकरिता प्रमुख पाहुणे म्हणून सिंबायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या...
पोलीस स्टेशनमध्ये येणारे कोणी आका, काका किंवा इतर कोणीही असो कुणाला सोडणार नाही - पोलिस आयुक्त अमितेश कुमार
पुणे(प्रतिनिधि)--पुण्यातील काही गुन्हेगार बाहेरील जिल्ह्यात जाऊन पवन चक्क्या वाल्यांना त्रास देतात, धमक्या देतात. त्यांची माहिती गोळा केली जात आहे. पोलीस स्टेशनमध्ये येणारे कोणी आका, काका किंवा इतर कोणीही असो कुणाला सोडणार नाही. त्यांना सात पिढ्या लक्षात राहील, असा धडा शिकवू, असा इशारा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. पुणे पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते....
निलम गोऱ्हे यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार
पुणे(प्रतिनिधि)--नीलम गोऱ्हे यांनी जाणीवपूर्वक एक उदात्त आणि भव्यदिव्य परंपरा असणाऱ्या पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने अत्यंत बेताल वक्तव्य केले आहे. सत्ताधारी पक्षांना खुश करुन राज्यसभा किंवा मंत्रीपद पदरात पाडून घ्यायचे असतील, तर त्यांनी ती खुशाल पाडून घ्यावीत. मात्र, त्यासाठी सत्ताधाऱ्यांचे लांगुलचालन करताना त्यांनी पक्ष आणि पक्षप्रमुखांवर चिखलफेक करण्याचा प्रयत्न केला आहे तो अत्यंत अश्लाघ्य असल्याची प्रतिक्रिया शिवसेना...
कुख्यात गुंड गज्या मारणेला अटक
पुणे(प्रतिनिधि)—पुण्यातील कोथरुडमध्ये शिवजयंतीच्या दिवशी भाजपा कार्यकर्ता संगणक अभियंता देवेंद्र जोगला कुख्यात गुंड गजानन मारणे याचा भाचा आणि इतरांनी जबर मारहाण केल्या प्रकरणी कुख्यात गुंड गजानन मारणेला अटक करण्यात आली आहे. गजानन मारणे स्वत: कोथरूड पोलिस ठाण्यात हजर झाला.मारहाण करण्यात आलेला जोग हा भाजप आणि केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्ता आहे. दरम्यान, मारहाणीच्या घटनेनंतर  मोहोळ यांनी पुणे...
हा तर मोदींचा चमत्कार : अमित शहा यांचा राहुल गांधींना टोला
पुणे(प्रतिनिधी)-- महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला ऐतिहासिक बहुमत मिळवून दिले असून, कोणती शिवसेना आणि राष्ट्रवादी खरी, हेही दाखवून दिले आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर शनिवारी निशाणा साधला. एकाच दिवशी, एकाच वेळी २० लाख जणांच्या खात्यात पैसे जमा होणे, हा मोदींचा चमत्कार असल्याचा टोलाही त्यांनी राहुल गांधी यांना उद्देशून लगावला.केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास...