पुणे(प्रतिनिधि)--राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ५ मे रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला होता. आता बारावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका, स्थलांतर प्रमाणपत्र, तपशीलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख यांचे वाटप संबंधीत विभागीय मंडळांमार्फत सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना १६ मे रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात येणार आहे. त्यानंतर उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्याच दिवशी दुपारी तीन वाजता विद्यार्थ्यांना...
महत्वाच्या बातम्या
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायूती म्हणूनच लढणार – देवेंद्र फडणवीस : अपवादात्मक परिस्थितीत वेगळे लढणार
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)—आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्हाला महायुती म्हणून लढाईच्या आहे. आम्ही तिघेही एकत्र आहोत. आमच्या तिघांची ही महायुती आहे. मात्र काही अपवादात्मक ठिकाणे वगळता इतर सर्व ठिकाणी महायुती म्हणून निवडणूक लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. अपवादात्मक परिस्थितीमध्ये वेगळं लढावं लागलं तरी एकमेकावर टीका न करता सकारात्मक प्रचार करून आम्ही निवडणुका लढवू. मात्र, जास्तीत...
पुणे(प्रतिनिधि) –कौटुंबिक वादातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मांजरी परिसरातील समर्थ डेव्हलपर्सच्या इमारतीत घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.उज्वला नागनाथ वारुळे (वय ४०) असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून नागनाथ वसंत वारुळे (वय ४२, रा. रायखेल, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहेत.या...
पुणे(प्रतिनिधी)- पुणे-मुंबई महामार्गावर वडगाव तळेगाव फाटा चौकात कर्तव्यावर असणाऱया एका वाहतूक पोलिसाला भरधाव कंटेनरने चिरडल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. यामुळे वडगाव मावळमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.मिथुन वसंत धेंडे (वय ४९ रा. उरुळी कांचन, पुणे, सध्या वडगाव पोलीस स्टेशन ता.मावळ जि.पुणे) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. वडगाव मावळ पोलीस निरीक्षक...
क्राईम
कुख्यात गँगस्टर गजा मारणेला व्हीआयपी ट्रीटमेंट : गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्यासह चार पोलिस कर्मचारी निलंबित
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)--– कुख्यात गँगस्टर गजानन ऊर्फ गजा मारणेला सांगली कारागृहात हलवले जात असताना पोलिसांच्या उपस्थितीत महामार्गावरील एका ढाब्यावर मटण बिर्याणी खाऊ घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्यासह चार पोलिस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित केल्याचे अधिकृतपणे जाहीर केले आहे.गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक सुरज राजगुरु, पोलीस...
पुणे(प्रतिनिधि)--शहरातील प्रसिद्ध ससून रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याचा खळबळजनक मेसेज करून प्रशासनाला धास्तावून सोडणाऱ्या आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे, हा आरोपी स्वतः ससून रुग्णालयातच सुरक्षारक्षक म्हणून काम करतो.आरोपीचे नाव अरविंद कृष्णा कोकणी (वय २९, रा. येरवडा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तो ससून रुग्णालयात सुरक्षारक्षक म्हणून काम करतो.मिळालेल्या माहितीनुसार, १२ मे रोजी ससून रुग्णालयातील एका डॉक्टरच्या मोबाईल...














