gtag('js', new Date());
पुणे(प्रतिनिधी)-सुप्रसिद्ध भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी शांतपणे अखेरचा श्वास घेतला. डॉ. नारळीकर यांच्या निधनाने वैज्ञानिक आणि साहित्यिक विश्वात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. खगोलशास्त्रातील त्यांचे संशोधन आणि विज्ञानाचा सामान्यांपर्यंत प्रसार करण्याचे त्यांचे कार्य अविस्मरणीय आहे. डॉ. जयंत नारळीकर हे 'हॉईल-नारळीकर सिद्धांत'...
मुरलीधर मोहोळ यांचे महापालिकेला सक्त निर्देश
पुणे: शहरात मान्सूनपूर्व नालेसफाई आणि पूर व्यवस्थापनाच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे सक्त निर्देश केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे महानगरपालिकेला दिले आहेत. मागील काही वर्षांत कमी वेळेत अधिक पाऊस पडण्याच्या वाढत्या घटनांमुळे शहरात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे, पावसाळ्यापूर्वीची कामे वेगाने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करणे आवश्यक आहे, असे मोहोळ यांनी स्पष्ट...
'Travel with Joe' fame YouTuber Jyoti Malhotra arrested on charges of spying for Pakistan
सोशल मीडियाच्या झगमगाटात देशविरोधी कारवायांचे गंभीर आरोप समोर आल्याने खळबळ उडाली आहे. लोकप्रिय ट्रॅव्हल ब्लॉगर आणि युट्युबर ज्योती मल्होत्रा, जिचे 'ट्रॅव्हल विथ जो' हे यूट्यूब चॅनेल लाखो लोकांमध्ये प्रसिद्ध आहे, तिला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर समोर आलेली ही घटना, भारत आणि पाकिस्तानमधील तणाव अधिक वाढवणारी ठरण्याची शक्यता आहे.प्रसिद्ध युट्युबर ते...
पुण्यातील सरगम चाळीजवळ 'कोयता गँग'चा उच्छाद : वाहनांची तोडफोड
पुणे(प्रतिनिधि)-- शहरातील सरगम चाळीजवळच्या परिसरात पुन्हा एकदा 'कोयता गँग'ने दहशत निर्माण केली असल्याची घटना समोर आली आहे. हातात कोयते, कुऱ्हाडी आणि लांब सुऱ्यांसारखी शस्त्रे घेऊन आलेल्या सुमारे १० ते १५ तरुणांच्या टोळक्याने परिसरातील वाहनांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हे टोळके  सरगम चाळीकडून पळत आले. त्यांच्या हातात कुऱ्हाडी होत्या, कोयते होते. त्यांनी दगडफेकही केली....
अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती नाही
बारामती (प्रतिनिधी): बारामतीतील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा प्रवास उलगडताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाचा आवर्जून उल्लेख केला. "आज माझा धंदा आणि माझं सगळं कसं चाललंय? चांगलं चाललंय. माझ्या आजोबांच्या पुण्याईनं, माझ्या बापाच्या पुण्याईनं, माझ्या चुलत्याच्या पुण्याईनं उत्तम चाललंय," असे अजित पवार यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला...
तुमचे गेल्यावेळी तिकीट कापले, तसे पुढेही बघून घेऊ : खासदार मेधा कुलकर्णी यांना भाजप नेत्याकडून धमकी?
पुणे(प्रतिनिधि)--फलटण येथील यशवंत सहकारी बँकेच्या घोटाळा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर खासदार मेधा कुलकर्णी आणि भाजपचे नेते व महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यातील वाद उफाळून आला आहे. "बँकेच्या २३० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. परंतु मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याने ठेवीदारांच्या ठेवी अडचणीत आल्या आहेत. राज्याच्या सहकार खात्याकडे बँकेतील अनियमिततेबाबत तीन अहवाल आले आहे. सहकार खात्याने मोठी अनियमितता असूनही कायदेशीर...