gtag('js', new Date());
पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास
प्राचीनतम अशा हिंदू धर्मामध्ये मोक्षप्राप्तीला फार महत्त्व. जन्मजन्मांतरीच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी पुण्यसंचय करणे, व्रत-वैकल्ये करणे, यज्ञ - याग करणे, परमेश्वरावर श्रद्धा ठेवून वेद - उपनिषदांचे अध्ययन करणे या साऱ्या गोष्टी कराव्या लागत. पण प्रत्यक्षात वर्णाश्रम व्यवस्थेतील पहिल्या तीन वर्णातील पुरुषांनाच वेद-उपनिषदातील वचनांच्या अध्ययन- श्रवणाचा अधिकार. राहिलेल्या वर्णातील व्यक्ती व महिलांना मग मुक्ती मिळणार कशी? ज्यांना हे सारे करण्याचा अधिकार...
संत ज्ञानेश्वरांच्या चरणी एक कोटीचा सोन्याचा मुकुट अर्पण
पुणे(प्रतिनिधि)- संत ज्ञानेश्वर यांच्या निस्सीम प्रेमापोटी नांदेडच्या एका उद्योजकाने संत ज्ञानेश्वरांच्या चरणी एक कोटीचा सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे. या सोन्याच्या मुकुटाचे वजन जवळपास एक किलो आहे.भारत विश्वनाथ रामीनवार असे या भाविकाचे नाव असून ते एक प्रसिद्ध उद्योजक आहेत. मंगळवारी रामीनवार कुटुंबियांनी सोन्याचा मुकुट मंदिर समितीकडे सुपूर्द केला.भक्ती, कला आणि तंत्रज्ञान यांचा अद्वितीय संगम असलेल्या एका अलंकारिक मुकुटाचं आज...
माऊलींच्या पालखीचे थाटात प्रस्थान
पुणे(प्रतिनिधी)--  टाळ मृदंगाचा नाद...ज्ञानोबा-तुकोबा नामाचा जयघोष...अन् पावसाचा अखंड वर्षाव...अशा वातावरणात पवित्र इंदायणीच्या व लाखो वैष्णवांच्या साक्षीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीने गुरुवारी रात्री अलंकापुरीतून पंढरपूरकडे थाटात प्रस्थान ठेवले.प्रस्थान सोहळय़ाचा अमृतानुभव घेण्यासाठी वैष्णवांनी इंद्रायणीकाठी मोठी गर्दी केली होती. पावसाच्या सरी अंगावर झेलतच वारकऱयांनी प्रस्थान सोहळय़ाची वाट धरली आणि या जलधारांच्या साक्षीनेच सोहळा पार पडला. इंद्रायणी घाट, सिद्धबेट, हैबतबाबा पायरी, पुंडलिक मंदिर,...
राज्याच्या मनात आहे तेच मी करेन," उद्धव ठाकरे यांचे सूचक विधान
मुंबई- मुंबई (Mumbai) वाचवण्यासाठी मराठी माणूस एकत्र येऊ नये यासाठी काही 'मालकांचे नोकर' प्रयत्नशील असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे. "राज्याच्या मनात आहे तेच मी करेन," असे सूचक विधान करत, ठाकरे यांनी संभाव्य ठाकरे एकजुटीकडेही लक्ष वेधले. मात्र, ही मराठी शक्ती एकत्र येऊ नये म्हणून बाहेरील शक्तींकडून प्रयत्न सुरू असल्याचा...
पंढरीची अक्षर वारी : पंढरपूरच्या वारीचा इतिहास
महाराष्ट्राची सांस्कृतिक जडण-घडण करण्याचे कार्य प्रमुख पाच भक्ती संप्रदायांनी केले. नाथ संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, दत्त संप्रदाय, समर्थ संप्रदाय व वारकरी संप्रदाय* हे पाच प्रमुख संप्रदाय होते. या संप्रदायाच्या प्रेरणेतूनच मध्ययुगीन कालखंडातील मराठी वाड्मयाची निर्मिती झाली. या प्रत्येक संप्रदायाचा प्रभाव कमी -अधिक प्रमाणात समाज मनावर झाल्याचे दिसून येते. भारतीय संस्कृती व वाड्मय विश्वाचे भरण- पोषण करणारा प्रमुख संप्रदाय म्हणून नाथ...
खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला: पुणेकरांना सतर्कतेचा इशारा
पुणे(प्रतिनिधी): पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) आज, १९ जून २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजल्यापासून ४३४५ क्युसेक्स (Cusecs) वेगाने पाणी सोडण्यात येणार आहे. सध्या धरणातून २००० क्युसेक विसर्ग सुरू होता, तो वाढवण्यात आला आहे.  खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे येथील मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्षाने (Central Flood Control Room, Pune) यासंदर्भात 'सतर्कतेचा इशारा' जारी केला आहे.पावसाचे प्रमाण लक्षात घेता,...