gtag('js', new Date());
आम्हीच इथले भाई : पुण्यात पुन्हा ‘कोयता गँग’चा हैदोस: भवानी पेठेत १०-१२ वाहनांची तोडफोड
पुणे- पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटना वाढत असताना, 'कोयता गँग' ची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून भवानी पेठ परिसरात काही तरुणांनी मध्यरात्री हातात कोयते आणि तलवारी घेऊन प्रचंड हैदोस घातला. त्यांनी "आम्हीच इथले भाई, आमच्या नादी कोणी लागू नये" असा इशारा देत तब्बल १० ते १२ दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तोडफोड केली. या प्रकारामुळे...
जागतिक शांतीसाठी 'हिंदू प्रारूप' विकसित करणार
पुणे : जगाला जर शांतता हवी असेल, तर हिंदू जीवनविचारांच्या आधारावरच पुढे जावे लागेल. याचे प्रारूप येत्या पंचवीस वर्षांत संघ विकसित करेल अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS)अखिल भारतीय धर्मजागरण संयोजक शरदराव ढोले (Sharadrao Dhole) यांनी दिली. रविवारी (ता. २०) आयोजित पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या समन्वय बैठकीच्या समारोप सत्रात ते बोलत होते.फर्ग्युसन महाविद्यालयात पार पडलेल्या या बैठकीला संघाचे पश्चिम क्षेत्र...
पाकिस्तानचे भारताला लक्ष्य करणारे 'डिजिटल' षड्यंत्र उघड
नवी दिल्ली - एका गुप्तचर अहवालानुसार, पाकिस्तानच्या लष्कराने भारतामध्ये अंतर्गत फूट पाडण्यासाठी एक मोठे 'डिजिटल' षड्यंत्र रचले आहे. या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे की, पाकिस्तानी लष्कराने ३०० तज्ञांची एक विशेष सोशल मीडिया टीम तयार केली आहे.या पथकातील सर्व सदस्य भारतीय भाषांमध्ये पारंगत आहेत आणि त्यांना मासिक वेतनावर नेमण्यात आले आहे. या संघाचे मुख्य उद्दीष्ट्य भारतातील हिंदू समाजात...
पुणे बाजार समितीच्या कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करा
पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील (APMC)  कारभारातील अनियमितता आणि गैरव्यवहारांबाबत वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पणनमंत्री जयकुमार रावळ यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी पुणे बाजार समितीच्या कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत विद्यमान संचालक मंडळाकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता आणि गैरकारभार झाल्याच्या तक्रारी...
जयंत पाटील यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे नवे अध्यक्ष
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या (Nationalist Congress Party Sharadchandra Pawar faction) प्रदेशाध्यक्षपदी  मागील सात वर्षांपासून कार्यरत असलेले जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा  दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात  अनेक चर्चांना उधाण आले असून, पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांची पक्षाच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी घोषणा केली आहे. ही घोषणा...
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पूर्णत्वाकडे: डिसेंबर २०२५ पर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार
महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा आणि मुंबई-पुणे प्रवासाला नवी दिशा देणारा बहुप्रतीक्षित मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प (Mumbai-Pune Expressway 'Missing Link' project) आता पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे.  मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या दूरदृष्टीमुळे आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण होण्याच्या मार्गावर असून, डिसेंबर २०२५ पर्यंत तो वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे...