पुणे - टाटा स्काय या कंटेंट डिस्ट्रिब्युशन आणि पे टीव्ही व्यासपीठाने टाटा स्काय म्युझिक ही आपली रीव्हॅम्प्ड म्युझिक सेवा सादर केली आहे. टाटा स्काय म्युझिक आणि टाटा स्काय म्युझिक प्लस या आधीच्या दोन पोर्टफोलिओजची ताकद एकत्र करत नव्या स्वरुपातील टाटा स्काय म्युझिकमधून परवडणाऱ्या दरात अनेक अतिरिक्त लाभांसह समृद्ध आणि संलग्न असा अनुभव दिला जाणार आहे.
पुणे : एसओएसव्ही (SOSV) या व्हेंचर कॅपिटल (साहसवित्त) संस्थेच्या पुढाकाराने गुंतवणूकदारांकडून १४ लाख अमेरिकन डॉलर चा निधी मिळाल्याची घोषणा पुण्यात मुख्य कार्यालय असलेली सायजेनिका ने केली आहे. निधी मिळविण्याच्या या पहिल्या फेरीत मिळालेली रक्कम सायजेनिकाच्या पेशींमधील औषध वितरणाच्या सुरक्षित आणि कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाला मान्यता मिळविण्याच्या प्रयत्नांना गती मिळेल असा दावा करण्यात आला आहे.
पुणे : दिव्यांग, वयोवृध्द, रुग्णशय्येवरील व्यक्ती यांना घरात जाऊन लस देण्याचा आगळावेगळा उपक्रम पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या पुढाकाराने कसबा मतदार संघात सुरू करण्यात आला आहे. फिरत्या लसीकरण केंद्राच्या माध्यमातून घरोघरी जाऊन लस देण्याचा महाराष्ट्रातील हा पहिलाच उपक्रम आहे. फिरते लसीकरण केंद्र व कसबा मतदारसंघातील नागरिकांसाठी कोविड लसीकरण केंद्राचे...
पुणे : मराठा आरक्षण मुद्द्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी 16 जूनला पहिला मराठा मोर्चा काढण्याचे जाहीर करून रणशिंग फुंकले आहे. दरम्यान, या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उद्य(शुक्रवार) खासदार संभाजीराजे छत्रपती हे खासदार उदयनराजे यांची पुण्यात भेट घेणार आहेत.सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर संभाजीराजेंनी महाराष्ट्र दौरा करुन सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट...
राजकारण
जर मोदीजींनी इच्छा व्यक्त केली, तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही तयार – चंद्रकांत पाटील
News24Pune -
पुणे –आम्ही जंगलातल्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यातल्या वाघाशी दोस्ती करत नाही असा असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला लगावला. दरम्यान, वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत. आमची दुश्मनी कधीच नव्हती. आमच्या नेत्याची इच्छा ही आमच्यासाठी आज्ञा असते. जर मोदीजींनी तशी इच्छा व्यक्त केली, तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही तयार आहेच असेही ते म्हणाले.
राजकारण
देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे तन्मय फडणवीसने आरोग्य कर्मचारी म्हणून लस घेतल्याचे माहिती अधिकारात उघड
News24Pune -
पुणे : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे आणि माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे नातू तन्मय फडणवीस याने आरोग्य कर्मचारी म्हणून कोरोना प्रतिबंधक लस घेतल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. माहिती अधिकारात बारामतीतील माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी माहिती मागितली होती. तन्मय फडणवीसने हेल्थ वर्कर म्हणून लस घेतल्याचे त्यात समोर आले आहे.














