gtag('js', new Date());
पुणे—पुण्यातील सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी चितळे बंधू मिठाईवाले यांना अन्न व औषध प्रशासन विभागाकडे आणि पोलिसांकडे तक्रार करण्याची धमकी देत वीएस लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. विशेष म्हणजे तिघेही एकाच कुटुंबातील असून यातील महिला ही एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका आहे.novelty and best selling clothing
पुणे - काँग्रेसचे कोथरूड परिसरातील प्रभाग क्रमांक ११ चे कार्यक्षम, धडाडीचे नगरसेवक ॲड. रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांच्या वतीने कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त १८ ते ४४ वयोगटातील गरजवंत महिलांसाठी स्वखर्चाने लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. घरेलू कामगारांसह कोथरूड परिसरातील सुमारे तीन हजार महिलांना या मोहिमेचा लाभ होईल. नगरसेवक स्तरावर राबविण्यात येणारी ही पुण्यातील सर्वात...
पुणे : पुण्याजवळील सासवड येथे मंगळवारी महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर आज( बुधवार) कात्रज बोगद्याजवळ तिच्या 8 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या दोघांचाही खून झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. या महिलेचे नाव आलिया शेख असून तिच्या मुलाचं नाव अयान शेख आहे. पिकनिकसाठी हे कुटुंब बाहेर पडले होते. मायलेकांचे मृतदेह हाती लागल्याने त्यांचा खून...
पुणे - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केली होती त्यावरून महाविकास आघाडीत सारे काही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.  यावर अजित पवारांनी पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना  स्पष्टीकरण दिले आहे.महाविकास आघाडीचे सरकार शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन बनवल आहे. हे तिघे...
पुणे -दुबईस्थित अल अदील समूहाचे अध्यक्ष तथा मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांच्या सहकार्यातून ऑक्सिजनची तीव्र गरज भासणाऱ्या करोनाबाधित रुग्णांना घरापासून जवळच्या रुग्णालयापर्यंत पोचवण्यासाठी रिक्षा ॲम्ब्युलन्स हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. पुणेस्थित स्वदेश सेवा फाऊंडेशन व बघतोय रिक्षावाला फोरम या दोन स्वयंसेवी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने ही खास सेवा सुरू करण्यात आली असून त्याचे उद्घाटन नुकतेच...
पुणे-देशात कोरोनाचा सर्वात जास्त फटका महाराष्ट्राला बसला आहे. देशाच्या दहा टक्के जनता महाराष्ट्रात आहे अशा स्थितीत केंद्राने लसीचा पुरवठा करताना महाराष्ट्राला झुकते माप दिले पाहिजे अशी अपेक्षा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली.पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट येथे संचालक मंडळाच्या बैठकीसाठी राजेश टोपे उपस्थित होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत...