gtag('js', new Date());
पुणे महानगरपालिका मिळकतकर अभय योजनेची शेवटची संधी
PMC Tax : पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मिळकतकर थकबाकीदारांसाठी दिलासादायक ठरलेल्या 'अभय योजने'ची मुदत आता संपत आली असून, येत्या १४ आणि १५ फेब्रुवारी रोजी योजनेचे अखेरचे दोन दिवस शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर, जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन ७५ टक्के सवलतीचा फायदा घ्यावा, असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत करण्यात आले आहे.महानगरपालिकेने शहरातील थकबाकीदारांसाठी ही...
पुणे महापालिकेने सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक परिसरात मोठी कारवाई करत ५० हजार चौरस फुटांचे अतिक्रमण हटवले. पाणीपुरवठा प्रकल्पासाठी आरक्षित असलेल्या जागेवरील अनधिकृत हॉटेल आणि बांधकामांवर पालिकेने बुलडोझर फिरवला आहे.
पुणे: पुणे महानगरपालिकेच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाने आज वडगाव बुद्रुक परिसरात अनधिकृत बांधकामांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत मोठी धडक कारवाई केली. सिंहगड कॉलेज रस्त्यावरील पाणीपुरवठा विभागाच्या प्रकल्पासाठी आरक्षित असलेल्या जागेवर उभारलेली तब्बल ५० हजार २४३ चौरस फुटांवरील अतिक्रमणे महापालिकेने बुलडोझर फिरवून पूर्णपणे हटवली आहेत.वडगाव बुद्रुक येथील सर्व्हे नंबर ४१/WSTP ही जागा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या जलशुद्धीकरण केंद्र किंवा तत्सम प्रकल्पासाठी राखीव...
Maharashtra Sahitya Parishad election
Maharashtra Sahitya Parishad election dispute : -महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक रोखण्याची विरोधी गटाची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. निवडणूक थांबवण्याचे कोणतेही संयुक्तिक कारण नसल्याचे सांगत ही निवडणूक कायदेशीर असल्याचा निर्वाळा देण्यात आला. त्यामुळे मसापच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.राजकुमार भानुदास धुरगुडे यांनी सर्वोच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल केली होती. यामध्ये ही निवडणूक अवैध असून, ती थांबवण्याची मागणी करण्यात  होती. मात्र,...
भूजल संवर्धनासाठी 'रेनवॉटर हार्वेस्टिंग'ची व्यवस्था सक्षम करावी
Medha Kulkarni : भूजल संवर्धनासाठी पुण्यासह राज्यात पावसाच्या पाणीसाठवणुकीची (रेनवॉटर हार्वेस्टिंग) व्यवस्था तातडीने प्रभावी व सक्षम करण्याची मागणी खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी गुरुवारी राज्यसभेत केली. शून्य प्रहरात डॉ. कुलकर्णी यांनी हा मुद्दा उपस्थित करीत हा विषय केवळ पर्यावरणापुरता मर्यादित नसून, शहरी जलसुरक्षा, पूरनियंत्रण आणि हवामान बदलाशी जुळवून घेण्यासंबंधित असल्याचे त्यांनी नमूद केले.प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, "पुण्यासारख्या...
Shivneri Marathon
Shivneri Marathon : शिवजयंती महोत्सवानिमित्त शिवनेरी ट्रेकर्स असोसिएशन, मोरडे फूड्स व पोल्ट्री  ब्रिडर्स कोआॅर्डिनेशन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. १५  फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय पातळीवरील शिवनेरी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.शिवनेरी मॅरेथॉनचे हे चौथे वर्षे असून, ५, १० व २१.१ किलोमीटर या तीन गटात देश विदेशातील तीन हजारांहून अधिक धावपटू धावणार आहेत. केनियाच्या धावपटुचा संघ हे या मॅरेथॉन चे प्रमुख...
सक्षम उपक्रमाच्या माध्यमातून इंधन संवर्धन व शाश्वत ऊर्जा पद्धतीबाबत जागृती
पुणे(प्रतिनिधी)- सक्षम २०२६ या विशेष उपक्रम अंतर्गत हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.(एचपीसीएल) तर्फे इंधन संवर्धन आणि पेट्रोलियम उत्पादनांचा योग्य वापर याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावर पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय याअंतर्गत विविध तेल कंपन्यांच्या सहयोगाने आयोजित उपक्रमाचा हा एक भाग आहे.ही माहिती पत्रकार परिषदेत एचपीसीएलच्या पुणे विभागाचे वरिष्ठ विक्री व्यवस्थापक प्रसाद सावजी आणि...