क्रीडा
‘क्रायसॅलिस’चा बॉक्स क्रिकेटमध्ये ऐतिहासिक जागतिक विक्रम; ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंद
News24Pune -0
पुणे (प्रतिनिधी): ‘क्रायसॅलिस एंटरप्रेन्योर फोरम’ने (CEF) बॉक्स क्रिकेटच्या मैदानात ऐतिहासिक कामगिरी करत ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये आपले नाव सुवर्णअक्षरांनी कोरले आहे. १५ फेब्रुवारी रोजी पुण्यात पार पडलेल्या या स्पर्धेने जगातील सर्वात मोठी बॉक्स क्रिकेट स्पर्धा म्हणून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. विशेष म्हणजे, बॉक्स क्रिकेटसाठी यापूर्वी असा कोणताही जागतिक विक्रम अस्तित्वात नव्हता, त्यामुळे 'सीईएफ'ने या खेळासाठी नवीन श्रेणी निर्माण...
पुणे (प्रतिनिधी):पुणे आणि परिसरातील निपुत्रिक दांपत्यांना आता जागतिक दर्जाच्या आणि अत्याधुनिक प्रजनन उपचार सुविधा हडपसरमध्ये उपलब्ध झाल्या आहेत. इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटल लिमिटेडच्या वतीने हडपसर येथील ‘४१ सिटी हब’ मध्ये नवीन फर्टिलिटी क्लिनिकचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती पवनीत कौर यांच्या हस्ते नुकतेच उत्साहात संपन्न झाले.याप्रसंगी माजी नगरसेवक योगेश मुळीक, इंदिरा आयव्हीएफचे झोनल बिझनेस डायरेक्टर डॉ. अमोल लुंकड, डॉ....
महत्वाच्या बातम्या
छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी करणे भोवले : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल
News24Pune -
Harshvardhan Sapkal : छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी करून महाराजांचा अवमान केल्याच्या आरोपावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी याप्रकरणी लेखी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिलेल्या फिर्यादेत म्हटले आहे की, १४ फेब्रुवारी २०२६ रोजी...
महत्वाच्या बातम्या
महिला सन्मान की मतपेढीची रणनीती? : थेट रोख हस्तांतरणाच्या राजकारणाचा वाढता प्रभाव
News24Pune -
भारतीय लोकशाहीत कल्याणकारी योजना ही नवी बाब नाही. स्वातंत्र्यानंतरच्या दशकांमध्ये सरकारांनी गरिबी निर्मूलन, अन्नसुरक्षा, शिक्षण आणि ग्रामीण विकासासाठी विविध योजना राबवल्या. मात्र गेल्या काही वर्षांत एक नवीन प्रवाह ठळकपणे दिसू लागला आहे—मतदारांच्या, विशेषतः महिलांच्या, बँक खात्यात थेट रोख रक्कम जमा करणे. “सक्षमीकरण” या आकर्षक शब्दाखाली सुरू झालेल्या या योजनांनी आता निवडणूक राजकारणाचे प्रभावी अस्त्राचे रूप घेतले आहे. त्यामुळे हा...
महत्वाच्या बातम्या
शिष्यवृत्ती परीक्षा अर्ज भरण्यास २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ : इयत्ता ७ वी आणि ४ थीची शिष्यवृत्ती परीक्षा एकाच दिवशी होणार
News24Pune -
maharashtra scholarship exam 2026--महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ४ थी) आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ७ वी) साठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यास आता २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी शाळा नोंदणी आणि नियमित शुल्कासह अर्ज भरण्यासाठी ३० डिसेंबर २०२५ ते १३ फेब्रुवारी २०२६ अशी मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र, अनेक...
पुणे-मुंबई
समाजकार्याचे यशस्वी प्रयोग समाजव्यापी व्हावेत – अतुल लिमये ; जनकल्याण समितीतर्फे दादा लाड आणि महंत भारतभूषणदासजी महाराज यांना ‘श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)-- "समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात परिवर्तनाचे अनेक यशस्वी प्रयोग वैयक्तिक पातळीवर सुरू आहेत. मात्र, हे प्रयोग केवळ व्यक्तीपुरते मर्यादित न राहता समाजव्यापी होण्याची गरज आहे. तसे झाल्यास अशा प्रयोगांतूनच खऱ्या अर्थाने व्यवस्था परिवर्तन घडून येईल," असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमये यांनी शनिवारी येथे केले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे आयोजित ‘पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार’ प्रदान सोहळ्यात ते बोलत होते....














