gtag('js', new Date());
पुणे--कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी गाफील राहून चालणार नाही. उपचार यंत्रणा सुसज्ज ठेवण्यासोबतच चाचण्या व सर्वेक्षणात सातत्य ठेवा, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता, आरोग्य यंत्रणा सुसज्ज करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले. पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरातील निर्बंधामध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यासंदर्भात मंत्रालयस्तरावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी आज...
पुणे--  सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आरक्षणाचा टप्पा 50 टक्केंच्या पलिकडे जाऊ शकत नाही, अशी वास्तव परिस्थिती असतांना मराठा आणि ओ.बी.सी समाज आरक्षणाची मागणी प्रखरतेने मांडत आहे. पंरतू एकीकडे सरकारी नोक-या कमी होत असतांना किती समाजबांधवांना सरकारी नोकरीत सामावून घेणे शक्य होणार आहे हा चिंतनाचा विषय आहे. या पार्श्वभूमीवर यावर समाधानकारक तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्रात अधिकाधिक रोजगारभिमुख उद्योगधंदे आणणे...
पुणे--कोरोना काळात लोककलावंत, कलाकार आणि तंत्रज्ञ यांची परवड होत आहे. मुख्यमंत्र्यांच घराणं हे कलाकारांचं घराणं आहे त्यामुळे त्यांनी कलाकारांच्या भावना समजून घ्याव्यात तसेच कलाकारांना मासिक मानधन सुरु करण्याची नम्र विनंती लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी मुख्यमंत्र्याना केली आहे. गरजू कुटुंबियांना अन्नधान्य व रेशन किटचे वाटप कार्यक्रमात सुरेखा पुणेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पुणे-कोरोनाकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले. त्यामुळे आता देशाची आर्थिक परिस्थिती गंभीर झाली आहे. देशाच्या या अवस्थेला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत अशी टीका कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केली. केंद्र सरकारने कोणालाच सोडले नाही, ब्लॅकमेलिंग करून सरकारे पाडली. त्यामुळे देशात लोकशाही आहे की नाही हा प्रश्न लोकांना पडला आहे,असेही ते म्हणाले.
पुणे--पुणे जिल्ह्यातील टेमघर, पानशेत, वरसगाव तसेच खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत आहे.  त्यामुळे धरण पातळीत लक्षणीय वाढ झाली असून, मुठा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीला पूर आल्याने नदीपात्रातील बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. तर पावसाने पवना नदीला पूर आल्याने चिंचवडमधील मोरया गोसावी मंदिर परिसर पाण्याखाली गेले आहे.दुसरीकडे...
पुणे -पुणे महानगरातील संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि पुण्यातील स्वच्छ रक्तदान ज्येष्ठ प्रसारक श्री. दौलतराम मराठे यांचे नगर येथील त्यांच्या राहत्या घरी दीर्घ आजारानंतर दुःखद निधन ८८ वर्षाचे होते. मूळचे खानदेशातील असलेले दौलतराव काही वर्ष धुळ्यास वास्तव्यास होते. त्यानंतर पुणे येथे आल्यानंतर त्यांना संघाचे तत्कालीन प्रांत संघचालक स्व. बाबाराव भिडे यांचा निकटचा सहवास...