पुणे-“शरद पवारांना हे चांगलं माहिती आहे की देशात सगळीकडे ओबीसी आरक्षण सुरू आहे. ते केवळ महाराष्ट्रात गेलेलं आहे. परंतु, हा या राज्य सरकारचा नाकर्तेपणा आहे आणि अजूनही तो नाकर्तेपणा सुरू आहे. या राज्य सरकारला ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही. जोपर्यंत महापालिका, नगरपालिका आणि जिल्हापरिषद निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत चालढकल करायची आहे असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र...
पुणे-मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात अलीकडच्या काळात जातींमधील संघर्ष वाढायला लागल्याचे वक्तव्य केले होते. विशेषत: राष्ट्रवादी काँग्रसेच्या उदयानंतर जातीचा मुद्दा मोठा होत गेला, असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केला होता. तर राज ठाकरेंना पुरंदरेंच्या पलिकडे इतिहासाचं आकलन नाही, अशी टीका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केली होती. गायकवाड यांच्या टीकेला मनसे शहराध्यक्ष वसंत...
पुणे-15 ऑगस्टच्या सुटीच्या निमित्ताने पानशेत धरण परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या पुण्यातील एका कुटुंबावर काळाने घाला घातला. या कुटुंबाच्या चारचाकी गाडीचे टायर फुटल्याने गाडीवरील नियंत्रन सुटल्याने ती गाडी थेट धरणात बुडाली. त्यामध्ये या कुटुंबातील महिलेचा मृत्यू झाला तर पती आणि मुलगा यांच्या सावधानतेमुळे ते वाचले.काल १५ ऑगस्टची सुट्टी असल्याने शनिवार पेठेत राहणारे योगेश...
पुणे-अनैतिक संबंधातून एका 35 वर्षीय व्यक्तीचा तरुणीने खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. भेटण्यास टाळाटाळ करणाऱ्या व लग्नास नकार देणाऱ्या विवाहित प्रियकराचा काटा काढण्यासाठी प्रेयसीने जे कृत्य केले आहे. संबधित तरुणीने प्रियकराला लॉजवर बोलावत ओढणीने गळा आवळून त्याचा खून केला.याप्रकरणी संबंधित महिलेला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना चिंचवड स्टेशन...
पुणे-आपल्या राष्ट्रीय जीवनात छत्रपती शिवाजी महाराज नवीन अवतारी पुरुष म्हणून आलेले आहे. त्यांनी मोगल साम्राज्याचा शेवट करत हिंदूची स्थापना करण्यासाठी युक्ती, बुद्धी आणि शक्तीचा त्रिवेणी संगम घालून राज्य केले. देशात एक प्रकारची नवीन चेतना निर्माण केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज देशाचे नव्हे तर जगाचे 'हिरो' आहेत, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यानी काढले.
पुणे-देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डाजी यांच्या संकल्पनेतून ‘राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक’ अभियान सुरु झाले असून, सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी यामधून घेतली जाणार आहे. त्यामुळे याच्या अंमलबजावणीसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवकांनी झोकून देऊन काम केले पाहिजे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.पुणे शहर ग्रामीण...














