gtag('js', new Date());
The bridge accident at Kundamala-Maval is extremely unfortunate
पुणे--"हे बघा याबाबत मी वारंवार बोललो आहे आणि तरीही तुम्ही तेच तेच उगाळत बसले आहात. त्याबद्दल मी अगदी स्पष्टपणे याआधीच सांगितलं आहे की मी मला वाटेल तेव्हा मी बोलेन. तो माझा अधिकार आहे", असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, पहाटेच्या शपथविधीसाठी शरद पवार यांनीच तुम्हाला पाठवलं होतं? या पत्रकारांच्या प्रश्नावर संतप्त होत उत्तर देणं टाळलं.
पुणे-महाविकास आघाडीच्या सरकारमधून कुणी प्रथम बाहेर पडायचे आणि भाजपसोबत सरकार स्थापन करायचे, यासाठी सध्या राज्यात चढाओढ सुरू आहे. नेमका कोणता पक्ष आमच्यासोबत येणार याबाबत जाहीरपणे सांगण्याइतका मी राजकीयदृष्टय़ा असमंजस नाही. परंतु ‘नया साल, नई उमंग’, असे नक्कीच म्हणेण, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकार कोसळण्याचे गुरुवारी पुन्हा एकदा भाकीत वर्तविले.
'ओळखीमधून मिळालेली सेवा जास्त काळ टिकत नाही पण सेवेमधून मिळालेली ओळख चिरकाल टिकते.' याचा प्रत्यय स्व. बाळासाहेब देशपांडे यांच्या सेवाकार्यातून येतो. बाळासाहेबांचा स्वर्गवास होऊन २६ वर्षं होऊन गेली पण वनवासी कल्याण आश्रम म्हटलं की सर्वप्रथम बाळासाहेबांचंच नाव समोर येतं. कारण १९५२ साली छत्तीसगडमधील जशपूर येथे बाळासाहेबांनी लावलेल्या या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे आणि त्याच्या शाखा देशभर...
पुणे-महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाच्या वतीने येत्या रविवारी २६  डिसेंबरला ११ वा. आळंदी देवाची येथील न्यू इंद्रायणी गार्डन मंगल कार्यालयात राज्य शिक्षक मेळावा व परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासह विविध प्रश्नांवर सविस्तर ऊहापोह करण्यात येणार आहे. महासंघाचे अध्यक्ष गौतम कांबळे व महासचिव विठ्ठल सावंत यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.
पुणे-मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडय़ासह राज्याच्या काही भागांत येत्या 28 डिसेंबरला मेघगर्जनेसह व विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता पुणे हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे दिवाळीनंतर नाताळ व नववर्षाच्या आनंदावरही पावसाचे विरजण पडणार का, याची धास्ती वाढली आहे.कोकण व गोव्यात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. तर उर्वरित राज्यातील किमान तापमान...
पुणे– पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील (जि. पुणे) शेलपिंपळगाव येथे एका पैलवान तरुणाचा भर चौकात पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडून खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.नागेश सुभाष कराळे (३७, रा. शेलपिंपळगाव, ता. खेड, जि. पुणे ) असे खून झालेल्या...