gtag('js', new Date());
लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस
पुणे(प्रतिनिधी)--"मंगेशकर कुटुंबियांनी केवळ संगीताचीच सेवा केली नाही, तर देशप्रेम आणि समाजसेवेचा एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. 'लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस'च्या माध्यमातून उभारले जाणारे रुग्णालय केवळ उपचाराचे केंद्र नसून ते मानवतेच्या सेवेचे एक मंदिर ठरेल," अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगेशकर कुटुंबियांच्या कार्याचा गौरव केला. पुण्यातील 'लता आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस'च्या भूमिपूजन...
Pune Hostel Naxalite Support Controversy
पुणे(प्रतिनिधी)--पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात नोव्हेंबर २०२५ मध्ये भारतीय जवानांच्या कारवाईत ठार झालेला नक्षलवादी कमांडर हिडमा याचे समर्थन करणारे नृत्य सादर करण्यात आल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) आक्रमक पवित्रा घेत स्वारगेट चौकात आंदोलन केले आणि संबंधित दोषींवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. अभाविप पुणे महानगरच्या वतीने नक्षलवादी कमांडर हीडीमाचा...
चितळे बंधू व्हिजन पार्क उद्घाटन
पुणे: "चितळे बंधू हा आता केवळ महाराष्ट्राचा राहिला नसून तो एक खऱ्या अर्थाने ग्लोबल ब्रँड झाला आहे. ज्या पद्धतीने या कुटुंबाने आपल्या चार पिढ्यांचा वारसा जपत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे, ते पाहता येणाऱ्या काळात परदेशातील नागरिकही चितळेंचे पदार्थ घेण्यासाठी रांगा लावतील, असा मला ठाम विश्वास आहे," असे गौरवद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. चितळे बंधू मिठाईवाले यांच्या...
पुणे समग्र शिक्षा अभियान सामाजिक अंकेक्षण गोंधळ
पुणे(प्रतिनिधी)--महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटीमार्फत (MS-SSAT) पुणे जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या समग्र शिक्षा अभियानाच्या सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेत मोठा प्रशासकीय गोंधळ समोर आला आहे. या प्रक्रियेत प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन सर्वेक्षण करणाऱ्या प्रतिनिधींनी वस्तुस्थितीची शहानिशा न करता चुकीची माहिती ऑनलाईन पोर्टलवर नोंदवल्याने आणि जनसुनावणीच्या नियोजनाअभावी मुख्याध्यापकांना बुधवार(दिनांक १५ एप्रिल)  नाहक मनस्ताप सहन करावा लागला. विशेष म्हणजे, राज्यात 'पॅट'  परीक्षा सुरू असतानाही मुख्याध्यापकांना सुनावणीसाठी...
आरएसएस पुणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अभिवादन Slug:
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पुणे शहरात विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले. सिंहगड रस्ता येथे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर आणि सिंहगड भाग संघचालक सचिन नागपुरे यांनी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी भाग कार्यवाह विवेक गद्रे, शरद शिंदे, मंगेश पाटील उपस्थित होते. पुणे स्टेशन येथील डॉ. आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महानगर कार्यवाह सचिन...
आरएसएस संघ शताब्दी मंथन पुणे
पुणे -समाजात संघाबद्दल एक मोठी स्पष्टता निर्माण झाली आहे. संघाला जवळून आणि संघाच्या दृष्टीकोनातून समजून घ्यायला हवे. आपल्या भारताला जगात एक सर्वश्रेष्ठ देश बनवणे. जो जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सक्षम असेल आणि जगाला एक नवी वाट, मार्ग आणि दृष्टी देण्यास समर्थ असेल. अशा राष्ट्रनिर्मितीचे काम संघाने हाती घेतले आहे. आपणही त्यात योगदान द्यावे असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहप्रचार प्रमुख...