gtag('js', new Date());
पवारांचं सरकार येईल तेव्हा मराठा आरक्षण गायब होईल
पुणे(प्रतिनिधि)--राजीव गांधी यांनी आपल्यावर टीका करताना म्हटले होते, हम दो हमारे दो... परंतु गत १० वर्षे आणि यंदाची पाच वर्षे अशी १५ वर्षे देशात भाजपच्या नेतृत्वाखालचे सरकार आहे. १० वर्षांच्या कार्यकाळानंतर अजिबातही सरकारविरोधी लाटेचा फटका आपल्याला बसला नाही. त्यामुळे लोकसभेतील आपले यश छोटे मानता येणार नाही, असे सांगत कार्यकर्त्यांच्या निराश मनाला अमित शाह यांनी उभारी देण्याचा प्रयत्न केला. तसेच...
शरद पवार हे देशातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार
पुणे(प्रतिनिधि)—शरद पवार यांनी देशात भ्रष्टाचार रुजवला आणि त्याला संस्थात्मक भ्रष्टाचाराचे स्वरूप दिले. शरद पवार हे देशातील भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सूत्रधार (सरगना) आहेत हे मी ‘डंके की चोट पर’ सांगतो अशी खरमरीत टीका भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. भाजप सतेत येते तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळतं तर शरद पवारांचे सरकार आले की मराठा आरक्षण जातं असा...
'अथातो बिंब जिज्ञासा’ विवेकभान जागवणारा ग्रंथ
पुणे -सध्या जग विविध मार्गांवर अडखळते आहे. थांबले आहे. त्याला आपल्या परंपरेकडून आलेल्या ज्ञानाची गरज आहे. तो मार्ग आपण ज्ञान, भक्ती आणि कर्म यांच्या त्रिवेणी संगमातून दाखवू शकतो. ती दृष्टी देण्याचे काम डॉ. देगलूरकर यांच्या ग्रंथाच्या माध्यमातून झाले आहे', अथातो बिंब जिज्ञासा’ विवेकभान जागवणारा ग्रंथ आहे  असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.मंदिर स्थापत्य आणि...
डीपीडीसीच्या बैठकीत अजितदादांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे बघणेही टाळले
पुणे(प्रतिनिधि)—पुण्यामध्ये शनिवारी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा नियोजन समितीची (डीपीडीसी) बैठक पार पडली.या बैठकीला राज्यसभा खासदार म्हणून शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. मात्र, बैठक पूर्ण होईपर्यंत अजित पवारांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे बसलेल्या बाजूला बघणेही टाळलं होतं. त्यामुळे, पुण्यातील या डीपीडीसी बैठकीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे...
ऐतिहासिक वाघनखे शिवप्रेमींकरिता पुण्यनगरीमध्ये ठेवण्यात यावीत
पुणे(प्रतिनिधि)--महायुती सरकारच्या प्रयत्नातून लंडन येथील व्हिक्टोरिया अॅन्ड अल्बर्ट वस्तूसंग्रहालयातून छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली ऐतिहासिक वाघनखे ही महाराष्ट्रात दाखल झालेली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागातर्फे ती साताऱ्यात ठेवण्यात येणार आहेत. ही ऐतिहासिक वाघनखे तमाम शिवप्रेमीच्या दर्शनासाठी पुण्यनगरीत ठेवण्यात यावी अशी विनंती वजा मागणी भाजपचे पुणे लोकसभा समन्वयक (प्रभारी) आणि पुणे मनपाचे माजी सभागृह नेता श्रीनाथ भिमाले यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी...
Pimpri-Chinchwad district should be made in terms of administrative work
पिंपरी(प्रतिनिधी)--पुण्याएवढाच पिंपरी-चिंचवडचाही विस्तार झालेला आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड जिल्हा होणे आवश्यक बनले आहे. पिंपरी चिंचवडच्या विकासात माजी महापौर नानासाहेब शितोळे यांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन आमदार प्रसाद लाड यांनी केले. दरम्यान, रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.जुनी सांगवी येथे माजी महापौर स्व. अरविंद उर्फ नानासाहेब शितोळे यांच्या १० व्या स्मृति दिनानिमित्त अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या आवारात आयोजित रोजगार...