gtag('js', new Date());
राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत सलग दुस-या वर्षी कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळ प्रथम
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०२३ मध्ये पुणे शहर महापालिका क्षेत्र विभागात कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळाने सलग दुस-या वर्षी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर, भवानी  पेठेतील शिवाजी मित्र मंडळाने द्वितीय, नाना पेठेतील श्री काळभैरवनाथ तरुण मंडळाने तृतीय, नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने चौथे तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ...
Sahyadri Hospitals launched Asia's first state-of-the-art radiotherapy treatment
पुणे(प्रतिनिधि)— सह्याद्रि हॉस्पिटल्सने आशियातील पहिले अत्याधुनिक रेडिओथेरपी उपचार प्रगत व्हायटलहोल्ड तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा टोमोथेरपी Radixact X9 प्रणालीद्वारे सुरु केले आहेत. क्रांतिकारी तंत्रज्ञान प्रणालीमुळे रुग्णांना अतिशय अचूक थेरपी आणि अधिक परिणामकारक उपचार मिळणार आहेत.विशेषत: ज्या कॅन्सरमध्ये मोशन मॅनेजमेंट खूप महत्त्वाचे असते त्या रुग्णांसाठी हे तंत्रज्ञान एक मोठे वरदान ठरत असल्याची माहिती सह्याद्रि हॉस्पिटल्समधील लीड रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ. संजय हुनुगुंडमठ यांनी...
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये केवळ 100 ग्रॅम वजन वाढल्याने कुस्तीपटू विनेश फोगाट स्पर्धेतून बाहेर
नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वात मानाच्या मानल्या जाणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये केवळ 100 ग्रॅम वजन वाढल्याने 50 किलो वजनी गटात गोल्ड मेडलच्या जवळ पोहोचलेली कुस्तीपटू विनेश फोगाट हिला स्पर्धेतून बाहेर जावं लागल्याने देशभर हळहळ व्यक्त केली जात आहे. भारताच्या हातातोंडाशी आलेलं मेडल हिरावून घेतल्यामुळे भारतीयांकडून निराशा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे 50 किलो वजनी गटात आता फक्त गोल्ड आणि ब्राँझ...
रोहन भोसले आणि पिंटू साव यांच्या नव्या हिंदी चित्रपटाचा पोस्टर लाँच
पुणे : दिग्दर्शक सुमित कुलकर्णी यांच्या दिग्दर्शनाखालील नव्या हिंदी चित्रपटाचे पोस्टर नुकतेच लाँच करण्यात आले. या चित्रपटाचे नाव आहे “संगी” (ए फ्रेंड इन नीड इज़ ए फ्रेंड इंडिड). हा चित्रपट रोहन भोसले आणि पिंटू साव यांच्या बॅनरखालील यंत्रणा फिल्म्स आणि आर्मोक्स फिल्म्सच्या सहकार्याने बनत असून, पिकल एंटरटेनमेंट यांनी चित्रपटाचे वितरण करणार आहेत.या चित्रपटात प्रसिद्ध यूट्यूबर अरुण प्रभुदेसाई, मोनिका प्रभुदेसाई...
अनुसूचित जाती वर्गीकरण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची राज्य सरकारने तत्काळ अंमलबजावणी करावी
पुणे— अनुसूचित जाती व जमातींसाठी असलेल्या आरक्षणापासून वंचित राहिलेल्या जाती, जमातींना न्याय देण्यासाठी आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्याच्या  मा.सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालाचे स्वागत व समर्थन मातंग समन्वय समिती करीत आहे .तसेच या निकालाचे आकलन करुन अनुसूचित जातीचे वर्गिकरण करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने तात्काळ घ्यावा अशी मागणी मातंग समन्वय समितीचे राज्य समन्वयक भास्कर नेटके यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत केली .महाराष्ट्राचे आराध्य...
पुणे शहरात झिकाचा वाढता संसर्ग : २६ गर्भवती महिलांसह ६६ जण बाधित
पुणे(प्रतिनिधि)—पुणे शहरातील झिकाचा संसर्ग वाढत चालला आहे. पुणे शहरातील झिकाची रुग्णसंख्या ६६ वर पोहोचली आहे. दरम्यान, २६ गर्भवती महिलांना झिका व्हायरची लागण झालेली असून आतापर्यंत झिकाचा  संसर्ग झालेल्या चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.झिका व्हायरसचा सर्वात जास्त धोका हा गर्भवती महिला, लहान मुले आणि वृध्दांना आहे. झिकाची लागण झालेल्या आणि संपर्कात आलेल्या सर्वांची पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून तपासणी होणार आहे....