आरोग्याबाबत जागरूकता वाढल्यामुळे ग्राहकांकडून शुद्ध शाकाहारी बेकरी प्रॉडक्ट्सला मोठी मागणी

आरोग्याबाबत जागरूकता वाढल्यामुळे ग्राहकांकडून शुद्ध शाकाहारी बेकरी प्रॉडक्ट्सला मोठी मागणी
आरोग्याबाबत जागरूकता वाढल्यामुळे ग्राहकांकडून शुद्ध शाकाहारी बेकरी प्रॉडक्ट्सला मोठी मागणी

पुणे(प्रतिनिधि)–आरोग्याबद्दल सजग झालेल्या नागरिकांकडून शाकाहारी पदार्थांना मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे. त्यामुळे बेकरी उद्योगालाही चांगले दिवस येत आहेत. असे या उद्योगातील जाणकारांचे म्हणणे आहे. दुसरीकडे ही मागणी पूर्ण करण्याकरता पुण्यातील मालपाणी बेकलाईटची उत्पादनांची मालिका पुढे येत आहे.

आरोग्य तसेच पोषक पदार्थांबाबत नागरिकांमध्ये जाणीव अधिकाधिक वाढत आहे. त्यानुसार शाकाहारी पदार्थांची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत असून भारतातील शाकाहारी खाद्यपदार्थ उद्योगही त्यामुळे वाढत आहे. भारतातील बेकरी उद्योग १९९० च्या दशकापर्यंत अत्यंत असंघटित होता. त्यावेळी स्थानिक बेकरींचे बाजारपेठेत वर्चस्व होते. त्यामुळे शाकाहारी व मांसाहारी उत्पादने, पौष्टिक आणि स्वच्छ उत्पादने असा स्पष्ट भेद करणे अवघड होते. म्हणून शाकाहारी पदार्थांसोबतच मांसाहारी पदार्थ विकणाऱ्या बेकरीमध्ये जायचे लोक टाळतात

अधिक वाचा  मराठी भाषेच्या अभिजात दर्जासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याची गरज : पुढाकार घेण्याचे 'मसाप'चे शरद पवार यांना आवाहन

यातूनच संपूर्ण शुद्ध शाकाहारी बेकरी उत्पादने असलेल्या या खाद्यपदार्थ मालिकेचा जन्म झाला. या संकल्पनेबद्दल मालपाणी बेकलाईटचे अधिकृत प्रवक्ते म्हणाले, “वैयक्तिक पॅकबंद मालाचे व्यापारीकरण करणारा बेकलाईट हा एक ब्रँड आहे. कठोर दर्जा चाचण्या करून सर्वोत्तम आरोग्यकारक स्थितीमध्ये पॅकबंद केलेली बेकरी उत्पादने  त्यांनी सादर  केली . स्वच्छता आणि दर्जा यांच्याशी तडजोड न करता मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याकरता बेकलाईट हायएंड ऑटोमेशन आणि अन्य आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करते. शंभर टक्के शुद्ध शाकाहारी उत्पादने देणे हे आमचे ध्येय आहे. अत्यंत शुद्ध आणि सर्वोत्तम दर्जाचे घटक पदार्थ वापरून ते तयार केलेले असतात. घरी केलेल्या पदार्थांसारखा आपलेपणा व अस्सलपणा त्यांच्यात असतो.”

ते पुढे म्हणाले, “ चहाच्या निमित्ताने कुटुंब आणि मित्रांसोबत आपले बंध आणखी बळकट करण्यावर या ब्रँडचा विश्वास आहे. चहापानाला आणखी रंगतदार करण्यासाठी आमच्याकडे अनेक प्रकारचे स्नॅक्स उपलब्ध आहेत. नुकतेच त्यांनी साबुदाणा चिवडा, बटाटा चिवडा, लाल मिरची बटाटा चिवडा ही चिवड्याची श्रेणी सादर केली. हे फराळाचे पदार्थ उपवासासाठी अगदी योग्य आहेत.”

अधिक वाचा  आद्यक्रांतिवीर उमाजीराजे नाईक

खाद्यपदार्थांचा व्यवसाय २०३० पर्यंत १६२ अब्ज अमेरिकी डॉलर एवढा होईल आणि जागतिक प्रथिने बाजारपेठेत त्यांचा वाटा ७.७ टक्के असेल, असा अंदाज आहे. तसेच प्राणी आणि दुग्धजन्य प्रथिनांची बाजारपेठ २०३० पर्यंत १.२ ट्रिलियन अमेरिकी डॉलर एवढी होण्याचा अंदाज आहे. वनस्पती आधारित डेअरी बाजारपेठ वार्षिक एकत्रित २०.७ टक्के  वाढीसह २ कोटी १० अमेरिकी डॉलर वरून ६ कोटी ३९ अमेरिकी डॉलर पर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे.

 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love