gtag('js', new Date());
मुंबई-बेंगळुरू महामार्गावर कात्रज-देहूरोड बायपास मार्गावर अवजड वाहतूक निर्बंध घालण्याचा पोलिसांचा निर्णय
पुणे(प्रतिनिधी)- अत्यंत वर्दळीच्या कात्रज-देहूरोड बायपासवरील कोंडी सोडविण्यासाठी अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्याचा निर्णय पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी घेतला आहे. यामध्ये सकाळी आठ ते दहा आणि सायंकाळी पाच ते नऊ या रस्त्यावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली जाणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार असून, त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे.कात्रज-देहूरोड बायपास हा मुंबई-बेंगळुरू महामार्गाचा भाग असला तरीही सद्यपरिस्थितीत...
पुण्यात पाैडजवळ हेलिकाॅप्टर काेसळले, कॅप्टनसह चारजण जखमी
पुणे(प्रतिनिधी)--पुणे जिल्हयात मुळशी तालुक्यात पौडजवळ पाऊस सुरु असतानाच तांत्रिक बिघाड झाल्याने एक हेलिकॉप्टर शेतात कोसळल्याची घटना शनिवारी घडली. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी हेलिकॉप्टरच्या कॅप्टनसह चारजण जखमी झाले असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.या अपघातात जखमी झालेले कॅप्टन आनंद तसेच  दिर भाटिया, अमिरदिप सिंग, एस.पी.राम या चौघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  त्यांची प्रकृती स्थिर आहे. हे...
आम्हीच इथले भाई : पुण्यात पुन्हा ‘कोयता गँग’चा हैदोस: भवानी पेठेत १०-१२ वाहनांची तोडफोड
पुणे(प्रतिनिधि)--बदलापूर मधील लैंगिक अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेनंतर पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरातून सुद्धा अशाच प्रकारची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेत एका शिक्षकाने १२ वर्षाच्या विद्यार्थीनीचे लैंगिक शोषण केले आहे. दरम्यान, या प्रकरणातील शिक्षक लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात या अगोदर तुरूंगाची हवा खाऊन आला असून तो जामीनावर बाहेर आहे. पुन्हा त्याच शाळेत रूजू झाल्यानंतर पुन्हा तसाच घाणेरडा प्रकार त्याने केला...
महिलांच्या रक्षणाची जबाबदारी आजच्या राज्यकर्त्यांवर आहे; पण... त्याची जाण राज्यकर्त्यांना राहिलेली नाही
पुणे(प्रतिनिधि)--बदलापूरमध्ये एका शाळेत दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात पुण्यात शनिवारी महाविकास आघाडीच्या वतीने भर पावसात जेष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ‘निषेध आंदोलन’ करण्यात आलं. तोंडाला काळा मास्क लावून आणि हाताला काळी फीत बांधून शरद पवार यांच्यासह अन्य महाविकास आघाडीचे नेते या आंदोलनात सहभागी झाले. दरम्यान, “बदलापूरला बालिकेवर जो अत्याचार झाला, त्यामुळे सबंध देशात महाराष्ट्राच्या नावलौकिकाला प्रचंड धक्का...
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनास शरद क्रीडा-सांस्कृतिक प्रतिष्ठानचा पाठींबा
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे येत्या रविवारी घेण्यात येत असलेल्या महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसंदर्भात परीक्षार्थिंनी सुरू केलेल्या आंदोलनास शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानने पाठींबा जाहीर केला असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीचा साकल्याने विचार करावा, अशी विनंतीही निवेदनाद्वारे केली आहे.महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही परीक्षा रविवारी (दि. 25) होत आहे. याच...
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूस्तर्फे गंगोत्री धाम तिबेट बॉर्डरवरील हर्षिल गावामध्ये भारतीय सैनिकांसोबत रक्षाबंधन
पुणे : मजहब नही सिखाता, आपसमें बैर रखना... या ओळींतून सर्वधर्मसमभावाचा संदेश देत न-हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस्च्या विद्यार्थ्यांनी मानवी राखी साकारली. तसेच इन्स्टिटयूटस्तर्फे गंगोत्री धाम तिबेट बॉर्डरवरील हर्षिल गावामधील भारतीय सैनिकांसमवेत विद्यार्थ्यांनी पाठविलेल्या राख्या बांधून संस्थेच्या पदाधिका-यांनी रक्षाबंधन मोठया उत्साहात साजरे केले.जाधवर ग्रुपचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर व उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात भव्य मानवी...