क्राईम
पुण्यात तरुणीचा निर्घृण खून : हात, पाय, डोके धडापासून कापले : ओळख पटविण्यासोबत आरोपींचा शोध सुरू
News24Pune -0
पुणे(प्रतिनिधी)- पुणे शहरातील मुळा-मुठा नदीपात्रात खराडी परिसरात जेनी लाईट कन्स्ट्रक्शनमागे वॉटर प्रंट सोसायटीजवळ नदीपात्रात वाहून आलेला तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. अज्ञात आरोपीने पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने १८ ते ३० वयोगटातील या तरुणीचे डोके, हात, पाय धारदार हत्याराने कापून तिचा मृतदेह नदीपात्रात फेकून दिल्याचे समोर आले आहे. या तरुणीचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, पोलिसांकडून तिची ओळख...
पुणे(प्रतिनिधि)—जेष्ठ नेते शरद पवार भाजपला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत. तो धक्का नगर जिल्ह्यात बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपचे विवेक कोल्हे हे हातात तुतारी घेऊन आगामी विधानसभा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लढण्याच्या तयारीत असल्याच्या शक्यतांना मंगळवारी पुण्यामध्ये पुष्टी मिळाली आहे.पुण्यातील मांजरी येथे मंगळवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शरद...
महत्वाच्या बातम्या
शिवाजीनगर एसटी बस स्थानकाची उभारणी लवकरच सुरू होणार – आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची माहिती
News24Pune -
पुणे : शिवाजीनगर एसटी बसस्थानक उभारणीसाठी महामेट्रो आणि एसटी महामंडळ यांच्यातील करार अंतिम टप्प्यात आला असून येत्या तीन वर्षांत बस स्थानकासह तेथे भव्य संकुल उभारण्यात येणार असल्याची माहिती छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी कळविली आहे. यासंदर्भात विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडून गेल्या वर्षी शिरोळे यांनी या प्रश्नाला वाचा फोडली होती. त्यानंतर दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांशी अनेक बैठका घेत...
पुणे – पुण्यातील ८० बाल कलाकारांनी रविवारी (२५ ऑगस्ट) अयोध्या स्थित प्रभु श्रीराम मंदिराच्या प्रांगणात स्व.ग.दि माडगूळकर व सुधीर फडके रचित गीतरामायण सादर केले. पुणे येथील प्राजक्ता जहागीरदार यांच्या स्वरतरंग संगीत अकादमीतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.पुण्यातील "स्वरतरंग संगीत अकादमी" तर्फे बाल कलाकारांच्या गटासह होणारा व अयोध्या स्थित श्रीराम मंदिरात होणारा हा गीत रामायणाचा पहिला कार्यक्रम होता.आणि असा कार्यक्रम...
अर्थ
टीव्हीएस मोटर कंपनीने (टीव्हीएसएम) केली टीव्हीएस ज्युपिटर ११० लाँच : ड्युएल हेल्मेट अंडर- सीट स्टोअरेज, इंधन भरण्याची सोय पुढील बाजूस आणि प्रशस्त फ्लोअर बोर्ड
News24Pune -
पुणे– टीव्हीएस मोटर कंपनी (टीव्हीएसएम) या आघाडीच्या आणि दुचाकी व तीनचाकी वाहन क्षेत्रात कार्यरत असलेल्या जागतिक वाहन उत्पादक कंपनीने आज नवीन टीव्हीएस ज्युपिटर ११० लाँच केली. या स्कूटरमध्ये अत्याधुनिक इंजिन आणि भविष्यवेधी, या क्षेत्रात पहिल्यांदाच लाँच होत असलेली वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. नवीन टीव्हीएस ज्युपिटर ११० मध्ये ‘ज्यादा’ ही संकल्पना स्टाईल, मायलेज, कामगिरी, आरामदायीपणा, सोईस्करपणा, सुरक्षा आणि तंत्रज्ञान...
महत्वाच्या बातम्या
विद्यार्थी व महिलांच्या सुरक्षितेतसाठी पुण्यातील शिक्षणसंस्था घेणार पुढाकार : गुरुवारी (दि. २९ ऑगस्ट) शिक्षण संस्थाचलकांची बैठक
News24Pune -
पुणे : बदलापूर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी तसेच महिला सुरक्षिततेच्या विषयावर दूरगामी उपाययोजना करण्याच्या हेतूने पुण्यातील नामवंत शिक्षणसंस्थांनी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी शिक्षण संस्थाचालकांची एक महत्वपूर्ण बैठक गुरुवार, दि. २९ ऑगस्ट रोजी स. प. महाविद्यालयातील लेडी रमाबाई सभागृहामध्ये सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला पुण्यातील अधिकाधिक शिक्षणसंस्थांचे चालक, विश्वस्त, नियामक मंडळाचे...














