gtag('js', new Date());
काव्य शब्दों का खेल; उसमें विकार ना हों
पुणेः जीवनात अश्रूंसाठी दुःख लागते; दुःखासाठी वेदना लागतात; वेदनांसाठी लागते भावना; भावनांना असते संवेदना; संवेदनेला लागते जाणीव; अन् जाणीव व्यक्त करायला लागतात ते 'शब्द'. कविता हा शब्दांचा खेळ आहे. मनातील व्यथा सांगणे हेही कवितेचे लक्षण आहे. कवितेत वास्तविकता, कल्पना, समाजभान इत्यादींचा अंतर्भाव असावा मात्र तिच्यात विकार नसावा. कारण, शब्दांत विकार आला की कविता मार खाते,असे मत ज्येष्ठ कवी तथा...
गहुंजे येथील क्रिकेट स्टेडियमजवळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्लब हाऊस उभारण्याकरीत एमसीएच्या वतीने आर्किटेक्चरल डिझाईन स्पर्धेचे आयोजन
पुणे: पुण्याजवळील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए)च्या क्रिकेट स्टेडियमजवळ काही नवीन पायाभूत सोयीसुविधा निर्माण करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि अद्ययावत सोयीसुविधा असलेले क्लब हाऊस उभारण्याकरीता एमसीएच्या वतीने आर्किटेक्चरल डिझाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स (आयआयए)च्या पुणे केंद्राच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित केली जाणार असल्याची घोषणा एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार यांनी आज झालेल्या...
कालसुसंगत वेदज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावे
पुणे- "परंपरेने वेदांचे रक्षण आपण करत आला आहात. आज समाजात श्रद्धा जागृत ठेवण्यासाठी कालसूसंगत वेदज्ञान सर्वसामान्यांपर्यंच पोहचवले पाहिजे", असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. शास्त्रांमध्ये असं अस्पृश्यतेला स्थान नसतानाही भेदाभेद अमंगळ कशासाठी, असा प्रश्नही सरसंघचालकांनी उपस्थित केला.बालगंधर्व रंगमंदिर येथे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास आणि श्री सदगुरू ग्रुप पुणे तर्फे आयोजित वेदसेवक सन्मान सोहळ्यात ते...
वनराज आंदेकर खून प्रकरणी ताम्हिणी घाटातून पोलिसांनी 13 जणांना घेतले ताब्यात
पुणे(प्रतिनिधि)- पुण्यातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणी पोलिसांनी ताम्हिणी घाटातून आरोपींच्या मुसक्या आवळत १३ जणांना अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड असल्याचा संशय पोलिसांना असून, गायकवाडसह आंदेकरांची बहीण संजीवनी कोमकर, तिच्या दिराला पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. तिघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी ९ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मंगळवारी दिले. आंदेकर...
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या नेहरूंच्या वक्तव्याचे प्रायशित्त घ्या
पुणे(प्रतिनिधि)--छत्रपती शिवाजी महाराज हे भरकटलेला देशभक्त व दगाबाज लुटारू होते असे म्हणत महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान करणाऱ्या जवाहरलाल नेहरू यांची काँग्रेस, शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणण्याची गरज नाही असे म्हणणारे शरद पवार आणि मध्य प्रदेशात शिवरायांचे स्मारक उद्ध्वस्त होत असताना काँग्रेसच्या कारवाईविरोधात मूग गिळून स्वस्थ बसणारे उद्धव ठाकरे यांनी  शिवरायांच्या अस्मितेचे राजकारण करून महाराष्ट्रात अस्वस्थता माजविण्याचा कट शिजविला आहे, असा...
सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी फोडली कसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुपने
पुणे : बुधवार पेठेतील सुवर्णयुग तरुण मंडळाची दहीहंडी कसबा पेठेतील राधेकृष्ण ग्रुप दहीहंडी संघाच्या गोविंदांनी ७ थर लावून फोडली. मंगळवारी रात्री ९  वाजून ८ मिनीटांनी दहीहंडी फोडण्यात गोविंदांना यश आले. विराज कांबळे या बालगोविंदाने हंडी फोडली.कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरासमोरील जय गणेश प्रांगण येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने,...