gtag('js', new Date());
दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची कोणतीही चर्चा चालू नाहीये
पुणे(प्रतिनिधी)--अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपची विश्वासार्हता कमी झाली आहे. त्यामुळे आता तुम्ही थोडसे दूर उभे रहा, असे भाजपवाले त्यांना म्हणू शकतील. तुम्ही वेगळी निवडणूक लढवा. निवडणुकीनंतर परत आपण जवळ येऊ. अशा प्रकारचा सल्ला दादांना दिला जाऊ शकतो, अशी शंका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी येथे व्यक्त केला.पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमानंतर ते बोलत होते. पाटील...
धर्म हीच आपल्या राष्ट्राची जीवनशक्ती
पुणे ; महाराष्ट्रातील मराठे तमिळनाडूत परके ठरले नाही. कारण स्थानिक समाजजीवनाला त्यांनी समृद्ध केले. आपल्यातील हा एकतेचा धागा  धर्मातून येतो. सत्यातून येणारा हाच हिंदू धर्म भारतीय राष्ट्राची प्रेरणा आहे,तीच आपली जीवनशक्ती आहे असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले.कोथरूड येथील बालशिक्षण मंदिरात तंजावरचे मराठे या पुस्तक प्रकाशन पू.सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते झाले, त्यावेळी...
राजकीय नेत्यांनी स्वत:ची विश्वासार्हता गमावली आहे
पुणे(प्रतिनिधी)- सामाजिक, धार्मिक एकोपा आणि कायदा सुव्यवस्थेच्या अभाव, हे आजघडीला महाराष्ट्रासमोरील प्रमुख आव्हान आहे. त्याचबरोबर राजकीय नेत्यांनी स्वत:ची विश्वासार्हता गमावली असून, ती वाढवणे, हेही एक मोठे आव्हान असल्याचे मत राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र व्हिजन 2050' या व्याख्यानात ते बोलत होते. पाटील म्हणाले, राज्यातील वातावरण बदलत आहे....
आद्यक्रांतिवीर उमाजीराजे नाईक
अथांग परिश्रम, अलौकिक पराक्रम आणि उत्तुंग कर्तृत्व करून इतिहासाच्या सुवर्ण पानांवर स्वतःचे स्थान निर्माण करणारे अनेक वीर या भारतभूमीत निर्माण झाले. या प्रत्येक महापुरूषांच्या चरित्रात त्यांचे व्यक्तीमत्व त्या काळातील स्थळ-काळ सापेक्ष घटना आणि त्यांचा तात्कालिक तसेच शाश्वत विचार आपल्याला अभ्यासायला मिळत असतो. इतिसातील महापुरुषांच्या जीवनातील रमणीय गोष्टींचा मनोरंजनासाठी उपयोग होत असतो. परंतू यासोबतच त्या महापुरुषांच्या सध्याच्या वर्तमान काळातील परिस्थितीतही...
हडपसरमध्ये महायूतीत मिठाचा खडा ; विकासकामाचे श्रेय लाटताना राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनी भाजपला डावलल्याचा आरोप
पुणे(प्रतिनिधि)--भाजपच्या आमदारांनी केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न हडपसरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांनी केल्याचा आरोप करत भाजप पदाधिकाऱ्यांनी मांजरी उड्डाणपुलाच्या नामफलकास काळे फासून आंदोलन केले.  महायुतीचा धर्म राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराकडून पाळला जात नसल्याने निषेध व्यक्त करण्यात आला. राज्यात नेते एकी दाखवत असताना हडपसरच्या महायुती मध्ये मात्र मिठाचा खडा पडला आहे. आंदोलकांनी पालकमंत्री अजित पवारांना निवेदन देऊन नाराजी व्यक्त...
पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री (IPO) मंगळवारी, १० सप्टेंबर २०२४ रोजी खुली होणार
मुंबई : पी. एन. गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेड ("कंपनी") ने मंगळवारी, १० सप्टेंबर २०२४ रोजी आपली प्राथमिक समभाग विक्री ("ऑफर") खुली करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. बोली / ऑफर बंद होण्याची तारीख गुरुवार, १२ सप्टेंबर २०२४ असेल. प्रमुख गुंतवणूकदार बोली तारीख बोली/ऑफर खुली करण्याच्या एक कार्यालयीन दिवस आधी म्हणजेच सोमवार, ०९ सप्टेंबर २०२४ आहे.ऑफर साठी प्रति इक्विटी शेअर्ससाठी 456 रु....