शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये रामराजे निंबाळकर यांच्या प्रवेशाचे शरद पवारांनी दिले संकेत : 14 ऑक्टोबरला फलटणला होणार प्रवेश ?

Sharad Pawar hinted at Ramraje Nimbalkar's entry into Sharad Pawar's NCP
Sharad Pawar hinted at Ramraje Nimbalkar's entry into Sharad Pawar's NCP

पुणे(प्रतिनिधि)–भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील  यांनी आपली कन्या अंकिता पाटील आणि कार्यकर्त्यांसह सोमवारी इंदापूरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात जेष्ठ नेते शरद पवार आणि दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत यांच्या उपस्थितीत  राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमात शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आणखी एक धक्का देणारे वक्तव्य केले. एवढेच नव्हे तर जवळपास १ महिन्याचे सगळे दिवस बुक झाले आहेत, अशा शब्दात शरद पवारांनी पक्षाकडे येणाऱ्या इच्छुकांची व उमेदवारांची गर्दी वाढत असल्याचे स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षामध्ये येणाऱ्या इच्छुकांची गर्दी वाढताना दिसत आहे. विशेषत: लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्याबरोबर गेलेले नेते तर भाजपमध्ये नाराज असलेल्या नेत्यांचा त्यामध्ये समावेश आहे. हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर पवार यांनी त्यांच्या भाषणात आणखी एका बड्या नेत्याच्या घरवापसीबद्दल सूचक विधान करत कळलं का? असा उपस्थितांना प्रश्न केला.

शरद पवार म्हणाले, इंदापूरच्या कार्यक्रमाला निघण्यापूर्वीच कुठूनतरी फोन आला. म्हणाले १४  तारखेला आमच्याकडे यावेच लागतंय. मी म्हणालो काय कार्यक्रम आहे, ते म्हणाले इंदापूरला जो कार्यक्रम आहे तोच आमच्याकडे आहे. मी म्हटलं कुठं, ते म्हणाले फलटणला… असे म्हणत शरद पवारांनी फलटणमधील रामराजे निंबाळकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षप्रवेशाचे संकेत दिले आहेत. तसेच, आता, याच्यानंतर फलटण, आणि फलटणनंतर जवळपास १ महिन्याचे सगळे दिवस बुक झाले आहेत, अशा शब्दात शरद पवारांनी पक्षाकडे येणाऱ्या इच्छुकांची व उमेदवारांची गर्दी वाढत असल्याचे स्पष्ट केले.

अधिक वाचा  #Supriya Sule: या साऱ्यामागे अदृश्य शक्तींचा हात : सुप्रिया सुळे

विधानपरिषदेचे माजी सभापती आणि विद्यमान आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या एका कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी महायुतीत होणारा अन्याय आणि त्रासाचा दाखला देत तुतारी हाती घेण्याची भूमिका मांडली होती. मात्र, संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण आणि रामराजे नाईक निंबाळकर यांनी कोणताही निर्णय जाहीर केला नव्हता. कार्यकर्ते महत्वाचे असून ऐतिहासिक निर्णय घेणार असल्याचं रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले. पुढील आठवड्यात कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. तत्पूर्वी रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेणार आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत ही भेट होणार असल्याची शक्यता आहे. या भेटीत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून कार्यकर्त्यांच्या भावना अजित पवारांसमोर मांडल्या जाणार असल्याची माहिती आहे. मात्र, या भेटीपूर्वीच शरद पवारांनी इंदापूरच्या कार्यक्रमातून थेट फलटणमधील मेळाव्याचे जाहीर केले. या मेळाव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

अधिक वाचा  नाही म्हणजे नाहीच; उगाच संभ्रम नको - शरद पवार

दरम्यान ते (हर्षवर्धन पाटील) बारामतीचेच जावई आहेत, आम्ही कुणालीही आमच्या मुली देत नाहीत, अशी स्तुतीसुमने उधळळी. तर, “तुम्ही हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेत पाठवा, राज्याची जबाबदारी द्यायचं काम माझं, असे म्हणत हर्षवर्धन पाटील यांना मंत्रीपदाचे संकेतही शरद पवार यांनी दिले.

यावेळी व्यासपीठावर विजयसिंह मोहिते-पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे, उत्तमराव जानकर हे उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना सुरुवातीलच हर्षवर्धन पाटलांनी लोकसभा निवडणुकीत आपण सुप्रिया सुळेंसाठी गुपितपणे काम केल्याचं सांगितले.

शरद पवार म्हणाले,  हर्षवर्धन पाटील यांच्यामुळे इंदापूरमधील पोकळी भरून निघेल, हर्षवर्धन पाटील आणि आमचा पक्ष वेगळा होता. पण, धोरणात कधी मतभेद नव्हते. जेव्हा नवीन काही करायचे असेल आणि जबाबदारी द्यायची असेल तर हर्षवर्धन यांचे नाव पहिलं यायचं. साखर कारखान्या संदर्भात ज्यावेळेस अडचण यायची त्यावेळेस मी हक्काने सांगायचो की हर्षवर्धन आपला माणूस आहे, तिथं पक्ष वेगळा असला तरी देखील. हर्षवर्धन पाटील यांच्याकडे बघून मला सारखं वाटायचं हा रस्ता चुकला. भाऊंनी आपल्याला दाखवले तेच आपलं घर, निर्णय घ्यायला वेळ लागला पण निर्णय घेतला. हा फक्त इंदापूर पुरता मर्यादित नाही, परंतु साखर व्यवसायाला चांगला दिवस आणणारा निर्णय असल्याचेही शरद पवार यांनी म्हटले.

अधिक वाचा  बिहारच्या निवडणुकीच्या निमित्ताने 'जंगलराज'शब्द्प्रयोगाची चर्चा: काय आहे या शब्दामागचा इतिहास? कोणी केला पहिल्यांदा हा शब्दप्रयोग?

मंत्रि‍पदाचे संकेत

हर्षवर्धन पाटील म्हणाले काहीही काम द्यावं. पण, काहीही कामासाठी हर्षवर्धन यांची गरजच काय, लोकांच्या हिताचं काम, कठीण कामे हर्षवर्धन पाटील यांच्याकडे द्यायला पाहिजेत. त्यासाठी, तुम्ही त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये पाठवा. मला स्वतः साठी काहीही मागायचं नाही, मला महाराष्ट्र बदलायचा आहे, महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. त्यामुळे, हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेमध्ये पाठवायचे तुमचं काम, राज्याची जबाबदारी काय द्यायचं ही माझी जबाबदार, असे म्हणत महाविकास आघाडीचं सरकार आल्यास मंत्रि‍पदाचे संकेतही शरद पवारांनी दिले आहेत.

काहीजण लोकं मला विचारत होते, कसं होणार, काय?, पण मी म्हटलं, काही काळजी करू नका, जावई कुणाचाय?, शरद पवारांनी असं म्हणतात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तसेच, आम्ही चांगलं घर बघूनच मुलींना देत असतो, त्यामुळे घर आम्हाला चांगलं मिळालंय, संसार नीट करणारा, महाराष्ट्राचा संसार नीट सांभाळणारा हा जावई आहे, जो बारामतीकरांनी तेव्हाच पाहिला होता, असे म्हणत शरद पवारांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love