महत्वाच्या बातम्या
‘अब्दुल सत्तार यांचे करायचे काय, खाली डोक वर पाय’, ‘पन्नास खोके एकदम ओके’च्या घोषणांनी सभागृह दणाणले
News24Pune -0
पुणे(प्रतिनिधि)—‘अब्दुल सत्तार यांचे करायचे काय, खाली डोक वर पाय’, ‘पन्नास खोके एकदम ओके’च्या घोषणांनी गुरुवारी निगडीतील ग. दि. माडगुळकर नाट्यगृह दणाणून गेले. विशेष म्हणजे राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती व सचिवांनी यांनी राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात या घोषणा दिल्या.महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या वतीने राज्यातील बाजार समित्यांच्या कामकाजात करावयाचे कालानुरूप बदल, शेतमालाच्या विपणनामध्ये अंगीकारावयाच्या आधुनिक...
पुणे(प्रतिनिधि)--"जागतिक शांतता दिवस साजरा करीत असताना दुसरीकडे अनेक देशात युद्धाचे सावट पसरले आहे. अशा युद्धजन्य परिस्थितीतून बाहेर येऊन जगात शांतता नांदावी. यासाठी विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घालावी लागणार आह.” असे विचार ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे विश्वराजबाग, लोणी काळभोर येथे आयोजित जगातील सर्वात मोठ्या शांती घुमटात १० व्या जागतिक विज्ञान, धर्मे/अध्यात्म आणि...
शारदीय नवरात्रोत्सव सुरु झाले आहे. चैतन्याने बहरलेल्या सृष्टीत आपण समरसून हा सोहळा साजरा करतो. या नवरात्री उत्सवात आपल्याला यंदा दिव्यदुर्गा भेटणार आहेत.निसर्गतः किंवा अन्य काही कारणाने दिव्यांगत्व आले असले तरी त्याची कमतरता न मानता न्युनत्वावर मात करत आपल्या उच्च मनोबलाच्या आधारे पराकोटीचे असामान्य कर्तृत्व अनेक महिलांनी सिद्ध केले आहे. ज्ञानाचे भांडार असलेल्या, आपल्या स्वतःच्या पायावर उभ्याअसणाऱ्या, इतरांच्याही जीवनात मोलाची...
पुणे: येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नोलॉजी विद्यापीठात उद्या ( गुरुवार ३ ऑक्टोबर २०२४) बहुप्रतीक्षित भारत-जपान फ्युजन फॅशन शोचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात भारतीय आणि जपानी परिधान परंपरेचा संमिश्र प्रदर्शन होणार आहे. कार्यक्रमाचा विषय "आपली सांस्कृतीक परंपरा जपा, शान वाढवा" असा ठेवण्यात आला आहे, ज्यामध्ये पारंपरिक भारतीय साडी आणि जपानी किमोनो यांचा समन्वयाने आधुनिक वेगळेपणा जपणाऱ्या फॅशनेबल...
महत्वाच्या बातम्या
महात्मा गांधी जयंतीनिमित्त अरविंद एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांनी राबविले ‘शाळा स्वच्छता अभियान
News24Pune -
पिंपरी(प्रतिनिधी) : जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी स्कुल आणि ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी शाळेचे वर्ग व शाळेचा परिसर स्वच्छ करीत स्वच्छता अभियानाने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी केली.राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव व...
पुणे-मुंबई
भव्य ४० बाय ८० फूट चित्रांद्वारे महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांना मानवंदना – जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटतर्फे आयोजन
News24Pune -
पुणे : देशाच्या जडणघडणीमध्ये मोठे योगदान देणा-या राष्ट्रपुरुषांना न-हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट तर्फे अनोखी मानवंदना देण्यात आली. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्ताने ४० बाय ८० फूट आकारातील भव्य चित्रांद्वारे तब्बल २०० विद्यार्थ्यांनी या राष्ट्रपुरुषांना मानवंदना दिली. या अनोख्या उपक्रमात महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची रेखाचित्रे देखील विद्यार्थ्यांनी काढली.संस्थेच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात २०...














