gtag('js', new Date());
सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार आमनेसामने
पुणे(प्रतिनिधि)— राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार आणि शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार बुधवारी बारामतीमध्ये आमनेसामने आले. यावेळी युगेंद्र पवार यांनी नमस्कार करत खासदार सुनेत्रा पवारांचे आशीर्वाद घेतले.महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधत सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार यांनी शास्त्री यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. या अभिवादनावेळी बारामती नगरपालिका आवारातील शास्त्री यांच्या पुतळ्या समोर दोघेही एकाचवेळी आमने-सामने...
खडकवासलाचे आमदार भीमराव तापकीर आणि इच्छुकांमध्ये उमेदवारीवरून खडाजंगी
पुणे(प्रतिनिधि)--विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. भाजपच्या गोटात तर प्रचंड घडामोडी घडत आहेत. भाजपमध्ये प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची भाऊगर्दी होताना दिसते आहे. त्यामुळे पक्षांतर्गत हेवेदावे समोर येत आहेत. असाच काहीसा प्रकार पुण्यातील खडकवासला मतदारसंघातील भाजपच्या बैठकीत पाहायला मिळाला. बैठकीदरम्यान भाजपच्या खडकवासला मतदार संघाचे आमदार  भीमराव तापकीर आणि उमेदवारीसाठी इच्छुक असलेले नगरसेवक प्रसन्न जगताप, नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांच्यात उमेदवारीवरून...
हिंदू समाजाच्या वतीने सामूहिक तर्पण आणि स्मरण संस्कार अखिल भारतीय पातळीवर सुरू व्हावा
पुणे(प्रतिनिधि)--धार्मिक परंपरेनुसार आपण आपल्या कुटुंबातील पितरांचे श्राद्ध करतो ही खूप प्राचीन परंपरा आहे. डॉ. हेगडेवार यांनी सांगितल्याप्रमाणे काही कौटुंबिक सणांचे राष्ट्रीय स्तरावर रूपांतर करणे आवश्यक आहे. केवळ आपले पितर नाही तर हिंदू समाजाचे जे पितर आहेत, विशेषत: सातव्या शतकाच्या शेवटच्या दशकांपासून आजतागायत हिंदुसमाजाच्या विकासासाठी, धर्म जतन करण्यासाठी त्यांचे हिंदू समाजाच्या वतीने सामूहिक तर्पण आणि स्मरण संस्कार अखिल भारतीय पातळीवर...
पुण्यातील बावधन गावात हेलिकॉप्टर कोसळले : तिघांचा जागीच मृत्यू
पुणे(प्रतिनिधि)—राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना घेण्यासाठी मुंबई जुहूच्या दिशेने निघालेले हेलिकॉप्टर पुण्यातील बावधन बुद्रुक गावात बुधवारी कोसळले. या दुर्घटनेत हेलिकॉप्टरमध्ये असणारे दोन वैमानिक आणि एका अभियंत्याचा जागीच मृत्यू झाला. हेलिकॉप्टर डोंगराळ भागातून जात असताना मोठ्याप्रमाणावर धुके होते. त्याचा अंदाज न आल्याने हेलिकॉप्टर कोसळले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे.ऑगस्टा १०९ असे या हेलिकॉप्टरचे नाव होते. हेलिकॉप्टरध्ये असलेल्या वैमानिकांची...
मिलिंद वाळंज यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद
पुणे - मिलिंद यांचे वडिल नंदकुमार वाळंज यांनी मुळशी भागातील लोकांसाठी सामाजिक कार्य केले आहे. त्यांचाच वारसा पुढे मिलिंद नेत आहेत. ते करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. असे गौरवोद्गार खासदार ओमराजे निंबाळकर यांनी काढले. मिलिंदादा वाळंज युवा मंच व मित्र परिवार यांच्यावतीने मिलिंद नंदकुमार वाळंज यांचा अभिष्टचिंतन सोहळा अ‍ॅम्बेव्हॅली येथे नुकताच पार पडला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते....
१० व्या जागतिक विज्ञान, धर्म/अध्यात्म आणि तत्त्वज्ञान संसदेचं विश्वराजबाग, पुणे येथे आयोजन
पुणेः २१ व्या शतकात भारत हा ज्ञानाचे दालन व विश्वगुरु म्हणून उदयास येऊन संपूर्ण जगाला सुख, समाधान आणि शांतीचा मार्ग दाखवेल. हे स्वामी विवेकानंदांचे भाकित सत्यात उतरविण्यासाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे ३ ते ५ अ‍ॅाक्टोबर या दरम्यान विश्वराजबाग, लोणी काळभोर येथे जगातील सर्वात मोठ्या शांती घुमटात १० व्या जागतिक विज्ञान, धर्मे/अध्यात्म आणि तत्त्वज्ञान संसदेचे आयोजन करण्यात आले आहे.या सम्मेलनचा...