पुणे-मुंबई
जगात शांतता निर्माण होण्यासाठी पत्रकारांनी ‘पीस जर्नलिझम’च्या तत्त्वांचा अंगीकार करावा : रोल ऑफ मीडिया इन एस्टॅब्लिशमेंट ऑफ पीस’ या परिसंवादात माध्यम तज्ज्ञांची भूमिका
News24Pune -0
पुणे :" युद्धजन्य किंवा ताणतणावाच्या परिस्थितीचे वार्तांकन करताना परिस्थिती चिघळणार नाही, याची काळजी पत्रकारांनी घेणे आवश्यक आहे. संवेदनशील परिस्थिती हाताळताना, त्यातून चुकीची माहिती समाजात पसरण्याची शक्यता असते. अशावेळी विचारपूर्वक वार्तांकन करणे गरजेचे आहे. तसेच पत्रकारिता करताना एका विचारधारेची बाजू घेऊन, एकांगी वृत्तांकन टाळावे. पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्याला समाजात आणि देशांमध्ये शांतता निर्माण करायची झाल्यास, पीस जर्नलिझमची मूल्ये तत्त्वे पत्रकारांना आत्मसात...
पुणे-मुंबई
दिल्ली येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची निवड
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)--मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नक्की कोणाची निवड होते याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतांना महामंडळाच्या आज (रविवार दि. ६ ऑक्टोबर) पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषद येथे झालेल्या बैठकीत ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाल्याचे घोषीत करण्यात आले .महामंडळ आणि इतर सहयोगी संस्था प्रतिनिधिंची आज महाराष्ट्र साहित्य परिषदेत...
पुणे-मुंबई
ज्येष्ठ इतिहासकार तथा संशोधक पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते अंभ्रूणी धनलक्ष्मी मातेची प्राणप्रतिष्ठा संपन्न
News24Pune -
पुणे- दरवर्षीप्रमाणे या वर्षीही धनलक्ष्मी प्रतिष्ठाण मंडई येथे शारदीय नवरात्रौत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यानिमित्ताने घटस्थापनेच्या दिवशी सायंकाळी ५ वाजता ढोल-ताशांच्या गजरात धनलक्ष्मी मातेची प्रतिष्ठापना आणि अभिषेक ज्येष्ठ इतिहास संशोधक तथा भारतीय इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आला.धनलक्ष्मी प्रतिष्ठान मंडई दरवर्षी नवरात्रोत्सवासह वर्षभर विविध प्रकारचे सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. तसेच गरजूंना विविध स्वरूपात मदत...
पुणे-मुंबई
भारतीय संस्कृतीचा आदर केल्यास, जगात शांतता प्रस्थापित होईल – केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)-: "भारतीय संस्कृती जगात सर्वात जुनी असून, त्यात धर्म, जात, पंथांमध्ये कोणताही भेदभाव नाही. मात्र, बदलत्या काळाच्या ओघात आपण ती विसरल्याने, सामाजिक प्रश्न आणि देशांतर्गत संकटे निर्माण झाले आहेत. भारतीय संस्कृतीमधील तत्त्वे आणि मूल्ये प्रत्येकाने आचरणात आणल्यास, जगात खऱ्या अर्थाने शांतता प्रस्थापित होण्यासाठी मदत होणार आहे," अशी भूमिका केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी जागतिक संसदेच्या समारोपात शनिवारी मांडली.एमआयटी...
पुणे : स्प्रिंगर नेचर इंडिया रिसर्च टूर २०२४ ने आज पुण्यातील प्रतिष्ठेच्या अशा भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत ('बोरी') येऊन करून एक मैलाचा दगड पार केला. संशोधनातील सचोटी आणि ओपन अॅक्सेस प्रकाशन या विषयांवरील संवादाला चालना देण्याच्या उद्देशाने हा दौरा सुरू आहे. यामध्ये भारतातील अग्रगण्य शैक्षणिक आणि संशोधन संस्थांशी त्यांच्या संशोधनाच्या गरजा समजून घेण्यासाठी आणि चर्चा, व्याख्याने, साधने आणि संसाधनांद्वारे...
पुणे-मुंबई
स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना पुण्याच्या विशेष न्यायालयाने बजावले समन्स
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी) : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुण्याच्या विशेष न्यायालयाने समन्स बजावले असून, २३ ऑक्टोबरला स्वतः किंवा वकीलमार्फत न्यायालयात हजर राहून बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत.सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. या दाव्याची सुनावणी आता आजी-माजी खासदार-आमदारांविरोधात खटले चालविणाऱ्या विशेष न्यायालयात होणार...














