gtag('js', new Date());
कॅम्पस अॅक्टिववेअरतर्फे विक्रांत मेस्सीची नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड
नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठ्या क्रीडा आणि अ‍ॅथलिझर फुटवेअर ब्रँड्सपैकी एक कॅम्पस अॅक्टिववेअरने भारतीय अभिनेता विक्रांत मेस्सीला त्यांचा नवीन ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घेतल्याची घोषणा केली आहे. कॅम्पस आणि विक्रांत मेस्सी यांच्यातील सहयोग हा शैली, बहुश्रुतपणा आणि स्व-प्रकटीकरण यांचे एक अद्वितीय मिश्रण आहे. हे गुणविशेष ब्रँड आणि अभिनेता विक्रांत मेस्सी या दोघांमध्येही प्रतिबिंबित होतात.विक्रांत मेस्सी त्यांच्या वैविध्यपूर्ण ऑनस्क्रीन कामगिरीसाठी...
सुझलॉन आणि जिंदाल रिन्यूएबल्सतर्फे स्टील उत्पादनाच्या डिकार्बनायझेशनसाठी ४०० मेगावॉट अंतर्गत पवन उर्जा व्यवहार
पुणे – सुझलॉन समूह पवन उर्जेच्या क्षमतेचा वापर करून ग्रीनहाऊस उत्सर्जन कमी करण्यास अवघड असलेल्या क्षेत्रांच्या डीकार्बनायझेशनसाठी योगदान देण्यासाठी सज्ज आहे. जेएसपी ग्रीन विंड १ प्रा. लि.कडून (जिंदाल रिन्यूएबल्स पॉवर प्रायव्हेट लिमिटेजची एसपीव्ही) मिळालेल्या ४०० मेगावॉटच्या लक्षणीय कंत्राटाद्वारे हे योगदान दिले जाणार आहे. हे लक्षणीय कंत्राट या क्षेत्रातील सर्वात मोठे सी अँड आय काम असून त्यावरून सुझलॉनचे बाजारपेठेतील आघाडीचे...
५५० कातकरी आदिवासींना जात प्रमाणपत्राचे वाटप
पुणे(प्रतिनिधि)--कातकरी आदिवासींकडे आजही बऱ्याच प्रमाणात जात प्रमाणपत्र, आधार कार्ड यासारखे ओळख सांगणारे किंवा दाखवणारे सरकारी दस्तावेज नसल्याने विविध सरकारी योजनांचा लाभ त्यांना घेता येत नाही. ओळख अधोरेखित करणारी ही प्रमाणपत्रे उपलब्ध व्हावी या उद्देशाने गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या जनजाती कल्याण आश्रम आणि पुण्यातील बांधकाम व्यावसायिक सुहास लुंकड यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. मुळशी तालुक्यातील माले गावात असलेल्या हुतात्मा...
२०४७ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकाची होईल
संगमनेर( प्रतिनिधी) -  रशिया युक्रेन युद्ध,  इराण इस्त्राईल संघर्ष या पार्श्वभूमीवर जागतिक परिस्थिती अस्थिर झालेली असतानाही भारत जगासाठी आश्वासक असे गुंतवणूक केंद्र आहे. भारतीय अर्थव्यवस्था ब्रिटनला मागे टाकून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. भारताचा जीडीपी वाढीचा वेग बघता २०४७ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकाची होईल असा आशावाद एम एफ डी सुनील कडलग यांनी व्यक्त केला.संगमनेर...
एमआयटी एडीटी विद्यापीठात 'टॅलेंट फ्यूजन' उत्साहात
पुणे: एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या स्कुल ऑफ काॅर्पोरेट इनोवेशन आणि लिडरशिप (एससीआयएल) यांच्या विद्यमाने आयोजित 'टॅलेंट फ्यूजन २k२४' या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा उत्साहात पार पडला. या स्पर्धेचे उद्दिष्ट विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या रोजगार कौशल्यांचा विकास करणे होते.विद्यार्थ्यांमधील क्षमता आणि व्यावसायिक कौशल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन होते. या वर्षीच्या पहिल्या फेरीत संपूर्ण विद्यापीठातून १९०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ३...