पुणे(प्रतिनिधि)—पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे मोलमजुरीसाठी आलेल्या भटक्या विमुक्त समाजाच्या कुटुंबातील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून पाण्याच्या बॅरलमध्ये बुडूवून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने राजगुरुनगर परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये मोठा संताप व्यक्त होत आहे.ही घटना राजगुरूनगर येथील वाडा रस्त्यावर घडली. खून केल्यानंतर आरोपी पुण्यात पळून आला आणि एका लॉजमध्ये लपला होता. त्याला अटक करण्यात...
क्राईम
आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा पत्नीनेच केला गेम : मुलाच्या मित्राबरोबरच्या अनैतिक संबंधातून केले कृत्य
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)— भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिनेच पैशाच्या आणि अनैतिक संबंधातून सतीश वाघ यांची हत्या घडवून आणल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुलाच्या मित्राबरोबर असलेल्या अनैतिक संबंधातील अडथळा दूर व्हावा यासाठी मोहिनी वाघ हिने पाती सतीश वाघ यांचा खुनाची सुपारी देऊन गेम केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, पुणे पोलिसांनी मोहिनी...
पुणे-मुंबई
प्रार्थना पद्धती वेगळी असली तरी धर्म व देशाप्रती भाव हवा : संत संमेलनात उमटला सूर
News24Pune -
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र धर्म टिकवला आणि वाढविला. त्याच महाराष्ट्रात संत चरणांचे आशीर्वाद मिळणे हे प्रत्येकाचे भाग्य आहे. पैसा, अपत्य किंवा लॉटरी हे भाग्य नाही. संत दर्शन हेच खरे भाग्य आहे. आपल्याकडे प्रत्येकाची प्रार्थना पद्धती वेगळी असली तरी धर्म व देशाप्रती भाव असायला हवा, असा सूर संत संमेलनात उमटला.हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन स.प.महाविद्यालयाच्या...
क्राईम
मद्यधुंद डंपर चालकाने पदपाथवर झोपलेल्या मजूर कुटुंबातील नऊ जणांना चिरडले : तीनजण ठार; सहा जखमी
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)- पदपथावर झोपलेल्या मजुरांच्या कुटुंबातील नऊ जणांना भरधाव डंपरने चिरडले. या भीषण घटनेत दोन चिमुरड्यांसह एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना वाघोली येथील केसनंद फाटा चौकात सोमवारी मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास घडली. तर, सहा जखमींवर ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. पदपथावर १२ जण झोपले होते. त्यातील तिघे बालंबाल बचावले. यातील डंपर चालकास अटक...
महत्वाच्या बातम्या
कृषी क्षेत्रात शाश्वतता आणण्याकरिता कृषी आणि विज्ञानाची सांगड घालणे महत्त्वाचे- देवेंद्र फडणवीस
News24Pune -
पुणे- कृषी क्षेत्रात शाश्वतता आणण्याकरिता कृषी आणि विज्ञानाची सांगड घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कृषीमधील पारंपरिक विज्ञानदेखील अत्यंत महत्त्वाचे आहे. आज पुन्हा संपूर्ण जग नैसर्गिक शेतीकडे वळताना दिसत आहे. नैसर्गिक बाबींचा वापर अधिकाधिक करुन उत्पादकता कशी वाढवता येईल तसेच खाद्यामध्ये विषयुक्त पदार्थांचा वापर कसा कमी करता येईल याचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्राने देखील नैसर्गिक शेतीचे अभियान स्वीकारले असून २५ लाख...
महत्वाच्या बातम्या
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण प्लस अंतर्गत महाराष्ट्रात १९ लाख ६६ हजार ७६७ घरे देणार : केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा
News24Pune -
पुणे(प्रतिनिधि)--माझा महाराष्ट्राशी सखोल संबंध आहे. मी महाराष्ट्राचा जावई आहे. मी ग्रामीण विकास मंत्री देखील आहे असे सांगत, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील गरीबांसाठी १९ लाख ६६ हजार घरे यावर्षी देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी आणि ग्रामीणविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केली. देशातील कोणत्याही राज्याला मिळालेल्या राज्यापेक्षा ही संख्या जास्त आहे. आतापर्यंत एका राज्याला एका वर्षात मिळालेली...














