gtag('js', new Date());
पुणे जिल्हाधिकारी पदी जितेंद्र डूडी रुजू
पुणे(प्रतिनिधि)-: पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून जितेंद्र डूडी यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी मावळते जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी त्यांचे स्वागत करून त्यांच्याकडे पदभार सोपवला.जिल्हाधिकारी डुडी यांनी यापूर्वी सन २०१९ मध्ये सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तळोदा, नंदूरबार, सन २०१९ ते २०२० या कालावधीत सहायक जिल्हाधिकारी मंचर तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय...
समाजात बंधुता रुजवण्यासाठी एकदिलाने काम करुया
कराड: "इतिहासाच्या सागरातून कोळसा उगळायचा की चंदन हे आपण ठरवायचं. खऱ्या अर्थाने आपल्या प्रत्येक कृती मधून बंधुता जोपासून आपण चंदनाचा सुगंध सर्वत्र पसरविण्यासाठी प्रयत्न करुया, आपली गावकी एक आहे पण भावकी सुद्धा एक झाली पाहिजे, असे प्रतिपादन बंधुता परिषदेचे अध्यक्ष माजी खासदार प्रदीपदादा रावत यांनी केले.दिनांक २ जानेवारी १९४० या दिवशी कराड मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रीय...
दत्तात्रय भरणे यांनी केली धनंजय मुंडे यांची पाठराखण
पुणे(प्रतिनिधि)-- बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराडच्या मुसक्या आवळल्याने मंत्री धनंजय मुंडेच्या अडचणी वाढल्याची चर्चा असतानाच क्रीडा खात्याचा पदभार अजूनही न स्वीकारलेले मंत्री दत्तामामा भरणे यांनी त्यांची पाठराखण केली आहे. अनेक मंत्र्यांचे मित्र असतात त्यांनी गुन्हा केला म्हणून मंत्र्यांवर आरोप करणे कितपत योग्य आहे? असा सवाल करत बीड प्रकरणात धनंजय...
वाल्मिक कराडला कडक शासन व्हावे
पुणे(प्रतिनिधी)--बीड येथील मस्सा जोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्येची घटना ही माणुसकीला कलंक लावणारी आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड हा तब्बल 20 दिवसानंतर स्वतःहून पोलिसांसमोर हजर झालेला आहे. आत्तापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य तीन आरोपींना लवकरात लवकर पोलिसांनी अटक केली पाहिजे. त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याला कडक...
शौर्यदिनी विजयस्तंभास लाखो अनुयायांकडून अभिवादन
पुणे(प्रतिनिधी)--जय भीमचा नारा, फडफडणारे नीळे ध्वज आणि आंबेडकरी चळवळीतील लाखो अनुयायांची विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी उसळलेली गर्दी...अशा वातावरणात कोरेगाव भीमा येथे २०७ वा शौर्य दिन बुधवारी साजरा करण्यात आला.मंगळवारी मध्यरात्रीपासूनच विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. सुमारे १०  लाख अनुयायी विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी पेरणे फाटा परिसरात राज्यासह देशभरातून आले होते. प्रशासनाकडूनदेखील होणारी गर्दी लक्षात घेता योग्य ती खबरदारी...
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन
नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (वय 92)  यांचे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झालं आहे. त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.प्रकृतीच्या अस्वाथ्यामुळे  डॉ. मनमोहन सिंग  हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर होते. 1991 साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंह...