आंबेडकर जयंतीनिमित्त रा.स्व. संघातर्फे अभिवादन : बौद्ध विहारांना भेट आणि शैक्षणिक उपक्रमांसह विविध उपक्रमांचे आयोजन

आंबेडकर जयंतीनिमित्त रा.स्व. संघातर्फे अभिवादन
आंबेडकर जयंतीनिमित्त रा.स्व. संघातर्फे अभिवादन

पुणे(प्रतिनिधि)– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यात विविध अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पुणे रेल्वे स्टेशन येथे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी डॉ. आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी पुणे महानगर संघचालक रविंद्र वंजारवाडकर आणि संघाचे प्रांतातील अधिकारी उपस्थित होते.

पिंपरी चौक येथील डॉ. यांच्या पुतळ्याला संघ कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे अभिवादन करत त्याचे रक्षण करण्याचा निर्धार करण्यात आला. याप्रसंगी पिंपरी चिंचवडचे जिल्हा संघचालक विनोद बन्सल, जिल्हा कार्यवाह नरेंद्र पेंडसे, हेमंत हरहरे, श्री मार्तंड देवसंस्थान श्रीक्षेत्र जेजुरीचे विश्वस्त अनिल सौंदडे, सामाजिक समरसता गतिविधीचे विलास लांडगे, सोपान कुलकर्णी, सुहास देशपांडे आदि उपस्थित होते.

अधिक वाचा  भगव्या ध्वजाला फडकं म्हणणं उद्धव ठाकरेंचा नतदृष्टेपणा- बावनकुळे

बारामती येथे डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी बारामती जिल्हा संघचालक दीपक पेशवे, पुणे विभाग संपर्क प्रमुख मंगेश मासाळ, जिल्हा प्रचार प्रमुख नवनाथ साळुंके, जिल्हा व्यवस्था प्रमुख किरण दंडवते, तालुका संघचालक विनोद पवार, तालुका समरसता प्रमुख नवनाथ मालगुंड, बारामती शहर प्रमुख श्रेयस राजेंद्र उपस्थित होते. पुणे महानगरातील विद्यापीठ भागाच्या वतीने औंध येथील डॉ. आंबेडकरांना पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी भाग संघचालक सुभाष कदम, भाग कार्यवाह संजय वाघुदे, सहकार्यवाह सारंग वाबळे आदींनी अभिवादन केले. यावेळी सहकार्यवाह सारंग वाबळे, राहूल भोर उपस्थित होते. सिंहगड भागात महानगर कार्यवाह सचिन भोसले आणि भाग संघचालक सुनील राऊत यांनी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. पर्वती भागात भाग संघचालक चंदुभाऊ कुलकर्णी यांनी पद्मावती बुद्ध विहार येथे डॉ. आंबेडकरांना मानवंदना दिली.

अधिक वाचा  पुणे रेल्वे स्थानकाचा होणार विस्तार;अन्य शहरांशी वाढणार कनेक्टिव्हिटी- मुरलीधर मोहोळ

बुद्ध विहारांना भेट

येरवडा भागातील विश्रांतवाडी नगरातील स्वयंसेवकांनी फुले नगर बुद्ध विहाराला भेट देत अभिवादन कार्यक्रमात सहभाग घेतला. नगराचे समरसता गतिवीधी प्रमुख नथू वावरे. संघचालक मिलिंद आईचीत, भाग सहकार्यवाह संदीप पुरकर, नगर कार्यवाह राघवेंद्र कोणेरी आदी उपस्थित होते. विद्यापीठ भागातील कार्यकर्त्यांनी बोपोडी परिसरातील विविध बौद्ध विहारांना भेटी देत अभिवादन कार्यक्रमात सहभाग घेतला

पाणपोई, व्याख्यान, वही पेन संकलन उपक्रम

पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळास्थानी अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांकरिता स्व.तात्या बापट स्मृती समिती यांचे वतीने पाणपोईची सोय करण्यात आली. मागील ३० वर्षांपासून ही सेवा अविरत सुरू असल्याचे संघाच्या समरसता गतिविधीच्या वतीने सांगण्यात आले. ग्रामीण भागातील वंचित मुलांसाठी ‘ एक वही एक पेन ‘ अभियानातंर्गत संकलित १५०० वही पेन भारतीय बौद्धजन विकास समितीला सुपूर्द करण्यात आले. यावेळी समितीचे प्रदीप पवार, प्रमोद गायकवाड यांचेसह विविध मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा  राष्ट्रीय एकात्मता अधोरेखित करण्यासाठी भव्य शोभायात्रेचे आयोजन

सामाजिक समरसता मंचपर्वती भाग

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134 जयंती प्रित्यर्थ मानवंदना व प्रतिमेला पुष्पमाला अर्पण  कार्यक्रम आज पद्मावती बुद्ध विहार येथे झाला. विहाराचे प्रमुख सुनीलजी ओव्हाळ, महानगर सह कार्यवाह प्रसादजी लवळेकर, भाग कार्यवाह दर्शनजी मिरासदार, पद्मावती नगर संघचालक मा अविनाशजी धोमकर उपस्थित होते. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघ शाखा प्रवासाच्या आठवणी याविषयी अनुभव कथन झाले. सुनीलजी ओव्हाळ हे स्वत: पूर्वी शाखेत शाखेत आले होते याच्या आठवणी सांगितल्या. बुद्ध वंदना करून कार्यक्रमाची  सांगता झाली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love