अन् गोष्टी सांगण्यात रमले आजी आजोबा…

Grandparents enjoyed telling stories
Grandparents enjoyed telling stories

पुणे(प्रतिनिधि)–आजच्या तंत्रज्ञानाच्या जगातील गोष्टींचा पुरेपूर वापर करीत लाकूडतोड्याची कुऱ्हाड (A woodcutter’s axe) या ऐवजी मोबाईलची गोष्ट, परीसाची गोष्ट, आईचे पिल्लू ही भावनांचा हळवा कोपरा दाखविणारी गोष्ट अशा विविध विषयांवरील मजेदार, स्वरचित गोष्टी सांगण्यात आणि ऐकण्यात आज आजी आजोबा दंग झालेले दिसले. निमित्त होते पुण्यातील भाषा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था (Bhandarkar Oriental Research Institute) व गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था (Gokhale Institute of Political Science and Economics) यांच्या सहकार्याने आयोजित कथायात्रेमध्ये झालेल्या आजी आजोबांसाठी ‘गोष्ट सांगा’ या स्पर्धेचे.

कथायात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाषा फाउंडेशनच्या अध्यक्षा व कथायात्रेच्या रचनाकार स्वाती राजे, जयदीप राजे आदी मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा  'रंग बरसे' मध्ये न्हाऊन निघाली विशेष मुले : भोई प्रतिष्ठानचा विशेष मुलांसाठी रंग महोत्सव

या उपक्रमाअंतर्गत ज्येष्ठ आजी आजोबांनी स्वरचित कथा, आपल्याच वयाच्या इतर ज्येष्ठ नागरिकांसमोर सादर केल्या. भांडारकर संस्थेच्या मोकळ्या आवारात या गोष्टी सांगण्यात आणि ऐकण्यात रमलेले आजी आजोबा या निमित्ताने अनुभविता आले. आपल्या सहभागाबद्दल बोलताना निवृत्त शिक्षक असलेले प्रकाश बोकील म्हणाले, “आजवरच्या प्रदीर्घ प्रवासाचे अनुभव अशा प्रकारे इतरांसमोर गोष्टीरुपात सांगण्याचा हा माझा प्रयत्न होता. येथे इतरांच्या कथाही मला ऐकता आल्या. गोष्ट ही प्रवाही साहित्य असल्याने अशा पद्धतीने पुढच्या पिढीपर्यंत ती पोहोचतीये याचा आनंद आहे. या उपक्रमाचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो.”

मला गोष्ट कशी सांगतात हे पहायचे आणि शिकायचे होते. या ठिकाणी तो अनुभव मला घेता आला. अनेकांनी आजच्या कालानुरूप गोष्टीत बदल केले आहेत, तेही फार भावले असे जयंत पांडे यांनी सांगितले.

अधिक वाचा  #Dr. Shamika Ravi : तथ्यांवर आधारित धोरण निर्मिती आवश्यक - डॉ. शमिका रवी

‘गोफ आठवणींचा’ या कथासंग्रहाच्या लेखिका असलेल्या शुभांगी मांडे आपला अनुभव सांगताना म्हणाल्या, “आजवर मुलांना, नातवंडांना, शेजारच्या लहान मुलांना गोष्टी सांगितल्या. येथे समोर प्रेक्षकांमध्येही ज्येष्ठ नागरिकच असल्याने आजचा अनुभव वेगळा होता. गोष्ट सांगताना आणि ऐकतांना प्रत्येक स्पर्धक उत्साही होता. मी ‘आईचे पिलू’ ही माझ्या संग्रहातील कथा या ठिकाणी सादर केली.” या वेगळ्या उपक्रमाचे परीक्षण करताना आम्हालाही सुंदर अनुभव आला असे स्पर्धेच्या परीक्षकांनी आवर्जून नमूद केले. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love