ग्लेनमार्कच्या ‘रियालट्रिस -ए झेड’चे भारतात पदार्पण

आरोग्य
Spread the love

मुंबई- संशोधनाधारित एकात्मिक औषधनिर्मिती करणा-या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेडने   ‘रियालट्रिस – ए झेड नेझल स्प्रे’ या मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या ऍलर्जिक -हिनटायटिस(नाकाच्या अंतर्भागाचा दाह) वरील उपचारासाठीच्या नेझल स्प्रेच्या (नाकात फवारण्याचे औषध) भारतातील पदार्पणाची घोषणा केली. श्वसन व्याधींवरील औषधे निर्मिण्यात एक प्रमुख कंपनी असलेल्या ग्लेनमार्क ने ‘ऍलर्जिक –हिनटायटिस’ वर इलाज करणारे हे ब्रँडेड जनरिक औषध भारतात प्रथम आणि किफायतशीर किमतीत आणण्याचा मान मिळवल्याचा दावा कंपनीने केला आहे.     

‘रियालट्रिस – ए झेड’ पूर्वनिश्चित मात्रेत औषध (मोमेटासोन ५० एमसीजी आणि अझेलास्टिन १४० एमसीजी ) म्हणून बाजारात आणणारी ग्लेनमार्क ही जगातील पहिली कंपनी  आहे 

एका पाहणीनुसार भारतातील मधील २० ते ३० टक्के लोकांमध्ये ऍलर्जिक -हिनटायटिस चा त्रास होतो. भारतात रुग्णांना औषधे स्वतःच विकत घ्यावी लागतात आणि हा उपचार नियमितपणे घेण्यातला एक मोठा अडसर ठरू शकतो. बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या अशाच प्रकारच्या औषधाच्या १० प्रमुख ब्रँडची किंमत सरासरी ३६५ रुपये आहे. मात्र ग्लेनमार्कच्या ‘रियालट्रिस – ए झेड नेझल स्प्रे’ च्या ७५ डोस पॅकची किंमत फक्त १७५ रुपये , म्हणजे बाजारात उपलब्ध असलेल्या अशाच प्रकारच्या औषधाच्या इतर १० प्रमुख ब्रँड्स च्या तुलनेत ५२ टक्के कमी असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.  

ग्लेनमार्क ने विकसित केलेले ‘रियालट्रिस – ए झेड  नेझल स्प्रे’ हे नवे पूर्वनिश्चित प्रमाणात देण्याचे औषध नाकात फवारण्याच्या स्वरूपात दिले जाते. ऍलर्जिक -हिनटायटिस ची समस्या असलेल्या १२ वर्षे किंवा अधिक वयाच्या व्यक्तीना हे औषध देता येईल. हा स्प्रे नाक चोंदणे. नाक वाहणे, नाकात खाज येणे, वारंवार शिंका येणे किंवा डोळे चुरचुरणे, लाल होणे अथवा डोळ्यातून पाणी वाहणे या ऍलर्जिक -हिनटायटिस च्या मुख्य समस्यांपासून  आराम देतो असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.    

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *