पुणे : खासदार गिरीश बापट यांची आज पुणे विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीच्या Pune Divisional Railway Consumer Advisory Committee अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. प्रवाशांचे प्रश्न सोडविणारी ही उच्चस्तरीय समिती मानली जाते.
खा.श्रीरंग बारणे,खा. धैर्यशील माने, खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर, खा.श्रीनिवास पाटील, खा.डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत बापट यांची या समितीच्या अध्यक्षपदी एकमुखाने निवड करण्यात आली.
समितीची ही बैठक व्हर्च्युअल पद्धतीने झाली. या बैठकीत रेल्वेच्या विविध प्रश्नांबाबत विशेषतः पुणे नाशिक लोहमार्ग, पुणे लोणंद लोहमार्गावरील भूसंपादन व त्यामध्ये येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा झाली. उपस्थित खासदारांनी त्यांच्या भागातील प्रश्न मांडले.पुढील काळात रेल्वेचे विभागीय प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार पाठपुरावा करण्याचे आश्वासन बापट यांनी यावेळी दिले. पुणे विभागाअंतर्गत सातारा सांगली कोल्हापूर आदी जिल्ह्यांचा समावेश होतो.