गवत,जाळ्या आणि झुडुपांनी वेढलेल्या तोरणा किल्ल्याने घेतला मोकळा श्वास


पुणे-लांबलेल्या पावसाळ्यात गवत,जाळ्या आणि झुडुपांनी वेढलेल्या तोरणा किल्ल्याची साफ सफाई ,देखभाल झाल्याने या किल्ल्याने आता मोकळा श्वास घेतला आहे.Torna Fort took a deep breath तोरणा किल्ल्याच्या देखभालीची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रचंड मेहनतीनंतर चिंतामणी  ज्ञानपीठ शिक्षण संस्थेच्या गड संवर्धन प्रकल्पाला यश आले आहे.  

 तोरणा गडाचे देखभालीची जबाबदारी स्विकारल्यानंतर माजी नगरसेवक अप्पासाहेब रेणुसे यांचे चिंतामणी ज्ञानपीठ शिक्षण संस्थेच्या वतीने नेमणुक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे समोर तोरणा गडाचे एकुणच साफ- सफाईचे मोठे आव्हान होते. त्यातच भर पाऊसाळ्यातच हि जबाबदारी स्वीकारली असताना संपूर्ण गड झाडाझुडपांत व उंच गवतात जणु काही झाकुन गेला होता.

कामाचे पहिल्याच दिवशी  मेंगाई मंदीर, तोरणजाई मंदीरात प्रवेश करणे देखील शक्य नव्हते. पण या रखवावदारांनी मेंगाई देवी व तोरणजाईदेवी मंदीरात नारळ फोडून हे आव्हान स्वीकारून पहिल्याच दिवशी उंच दाट गवत व झाडीझुडपातुन मेंगाई मंदरी खुले केले.त्यानंतर लगोलग तोरणजाई मंदीरावर लक्ष केंद्रित करून मंदीर व लगतच्या परिसराची साफसफाई केली. अवघ्या महिनाभरात टप्या टप्प्याने बिनी दरवाजा, कोठी दरवाजा,लक्कडखाना, अंबरखाना,सदर,दारुगोळा कोठार,भागातील वाढलेले गवत, काटेरी झुडपे,पदपाथ मोकळे केले.जोरदार पाऊस विषारी सापांची भिती, काटेरी जाळ्या या  सर्व अडथळ्यांवर मात करून कोकण दरवाजासह गडावरील पदपाथ,पायी मार्गाची साफसफाई हाती घेऊन गडाचा चेहरामोहराच बदलला.

अधिक वाचा  युवकाच्या मृत्यूस जबाबदार तपास अधिकारी व मदत करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा : शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानची मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे मागणी

पुरातत्व विभागाचे (  पुणे व रत्नागिरी)  सहाय्यक संचालक विलास वाहने यांनी दैनंदिन कामाचे नियोजन करून कामात सातत्य कसे राहील याची दक्षता घेतली. या तीनही रखवालदार कर्मचाऱ्यांनी तोरणाचे देखभालीत  झोकुन  दिलेलं आहे.  पुढच्याच महिण्यात बूरुंज व तटबंदीची साफसफाई हाती घेऊन गड परिसरातील बहुतांश पदपाथ व तठबंदी मार्ग मोकळे केल्यामुळेच आज तोरणा गड जणु काही श्वासच घेऊ लागला आहे.

 मागिल दोन- अडीच महिन्यांतच तोरणाचे साफसफाई हेच आव्हानात्मक काम जवळपा ६० टक्यांचेवर पुर्ण होत आलेलं आहे.  रेणुसे यांनी कर्मचाऱ्यांवर टाकलेला विश्वास आणि वेळोवेळी त्यांना हवी ती मदत करण्याची घेतलेली भूमिका  आज तोरणा किल्यासाठी हितकारक ठरत आहे.सामाजिक दायित्व योजनेतुन गडावर हा उपक्रम सुरु आहे . रखवालदार व कर्मचाऱ्यांशी पुणे व रत्नागिरी विभागाचे सहाय्यक संचालक  वाहने यांनी  व त्यांच्या सहकार्‍यांनी सतत संपर्कात राहून संवाद ठेऊन आज हे शिवकार्य यशस्वी केलेलं आहे..22 जुलै या उप मुख्य मंत्री अजित पवार यांच्या वाढ दिवशी या सामाजिक दायित्व अभियानाला प्रारंभ करण्यात आला होता .तोरणा  किल्ल्याची देखभालीची जबाबदारी स्वखर्चातून चिंतामणी   ज्ञानपीठ शिक्षण संस्थेकडून केली जात आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love