पुणे – देशातील धार्मिक ध्रुवीकरण – फॅसिझम पाहून देखील, ‘धर्म निरपेक्ष काँग्रेसवर’ आघात करणारी गुलाम नबींची भूमिका सखेद आश्चर्यजनक व कृतघ्नतेची आहे अशी प्रतीक्रीया काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी न्यूज24पुणेशी (www.news24pune.com) बोलताना दिली.
देशात सत्ताघारी भाजप कडून लोकशाही व संविधानिक मुल्यांची हेतू पुरस्पर पायमल्ली व टोकाचा धार्मिक ऊन्माद (फॅसिझम) होत असल्याचे दृष्टीस येऊनही, ‘काँग्रेस मध्ये राष्ट्रीय नेतृत्व घडलेल्या’ गुलाम नबी आझादांनी टोकाची घेतलेली भूमिका ही अत्यंत अप्रगल्भतेची, देशहित विरोधी व पक्षाप्रती कृतघ्नतेची असल्याची टीका गोपाळदादा तिवारी यांनी केली.
गुलाम नबींना, काँग्रेस विषयी एवढीच तळमळ होती व ‘जी-२३’ या काँग्रेसजनांच्या ग्रूप’चे ते नेतृत्व करत होते, तर येणाऱ्या पक्षांतर्गत निवडणुकीत त्यांनी पक्षीय अघ्यक्ष पदाच्या निवडणूकीला सामोरे जायचे होते, पक्ष हितासाठी पक्षात राहून संघर्ष करायला हवा होता.. त्यांनी जी२३ च्या काही सहकाऱ्यांसोबत ‘पक्षाच्या व्यासपीठावर’ काही धोरणात्मक भुमिका घेतली असती तर काँग्रेसजन ते समजू शकले असते. परंतू , काँग्रेस पक्षाचे खच्चीकरण करण्याकरीता ‘ते कोणाच्या तरी ईशाऱ्यावर काम करत असल्याचे स्पष्ट जाणवते’ असा आरोपही तिवारी यांनी केला आहे.
काँग्रेस नेतृत्वाने त्यांच्या बंडाच्या व स्पष्टवक्तेपणाच्या पत्राद्वारे घेतलेल्या भूमिकेनंतर देखील, राष्ट्रपतींकडे जाणारे शिष्टमंडळ असो, पत्रकार परीषद असो वा केंद्र सरकार विरोधी आंदोलन असो.. त्यांच्या जेष्ठत्वाचा मान पक्ष नेतृत्वाकडून राखला जात होता, हे सर्वच काँग्रेसजनांनी पाहीले आहे. मात्र, आज ते ‘जे आरोप करीत आहेत त्याची स्क्रीप्ट’ मात्र काँग्रेस विरोधकांनीच लिहील्याचे स्पष्ट होते असल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे.
जर ते ‘किमान ‘जी-२३ सदस्यांना’ एकत्रीत घेऊन पक्ष हिताची काहीच भुमिका घेऊ शकत नाहीत, तर मग ‘त्यांचे नेतृत्वावर पक्षातील किती सहकारी नेत्यांचा – कार्यकर्त्यांचा त्यांना विश्वास व पाठिंबा आहे’? असाही प्रश्न निर्माण होतो.
पक्षाच्या निर्णय पध्दती, वाटचाल चुकत असेल तर त्या विषयी नाराजी दाखवत, अलिप्त राहून देखील त्यांना ‘आपली क्षमता व ऊपयुक्तता’ सिध्द करता आली असती. काँग्रेस संपली म्हणण्याचे विधान करेंपर्यंत तरी का थांबलात? गेले काही वर्षे आपण ‘सीडब्ल्युसी’ मेंबर होता, तेंव्हा कोणत्या काँग्रेस सदस्यांनी तुम्हास निवडून दिले होते? असे प्रश्न उपस्थित करत पक्षांतर्गत निवडणुक प्रक्रीया ब्लॅाक पातळीवर असतांनाच सतर्कतेचा आवाज पक्षात ऊठवला नाही.. वा तसा प्रयत्नही न करता, पक्षाच्या प्रचलित कार्यपध्दतीवर जाहीर आसुडे ओढत, पक्षास बदनाम करण्याचे प्रयत्न निंदनीय आहे असल्याची टीका तिवारी यांनी केली.
‘पक्ष संघटना, पक्षीय कार्य पध्दती यां विषयी भाष्य करतांना, पक्षांतर्गत व पक्ष-पातळीवर काय बोलावे’.. व ‘माध्यमातून पक्षावर काय व किती तोंडसुख घ्यावे’, यातील “लक्ष्मण रेषा” ओलांडायची गरज नव्हती. यातुन व्यापक पक्षहित न साधता ऊलटपक्षी पक्षावर कृतघ्नतेने कुरघोडी करण्याचेच प्रयत्न झाले आहेत व त्यातुन पक्षाची बदनामी करण्याचे प्रयत्न झालेत. याच्या वेदना धर्मनिरपेक्ष व निस्वार्थ भावनेने पक्षाच्या ध्येय धोरणांवर विश्वास ठेवून वर्षानुवर्षे काम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांना झाल्या आहेत, असे तिवारी यांनी म्हटले आहे.
गुलाम नबी हे जम्मू काश्मीर’चे असुन, तेथून निवडून येऊ न शकल्यामुळे महाराष्ट्रातून (वाशीम) मधून लोकसभा व एकदा राज्यसभा ही दिली होती, याचे स्मरण ठेवले पाहीजे होते. त्यामुळे त्यांची ही कृती पक्षाप्रती कृतघ्नतेचीच पावती म्हणावी लागेल, असा टोलाही गोपाळ तिवारी यांनी लगावला आहे.