अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा : भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या मागणीने खळबळ

एखाद्या समाजाबद्दल किंवा धर्माबद्दल वाईट बोललेलं खपवून घेतलं जाणार नाही
एखाद्या समाजाबद्दल किंवा धर्माबद्दल वाईट बोललेलं खपवून घेतलं जाणार नाही

पुणे(प्रतिनिधि)–अजित पवारांनी पुणे जिल्ह्यातील भाजप संपवण्याचे काम केले. तेच आता आमच्या बोकांडी बसले आहे. याचा प्रचंड त्रास भाजपच्या कार्यकर्त्यांना होत आहे. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री आहेत. पण ते निधीही देत नाहीत. अजित पवारांमुळेच राहुल कुल मंत्री, पालकमंत्री होवू शकले नाहीत. अनेकांना महामंडळं मिळाली असती, पण त्यालाही अजित पवार आडकाठी करत आहेत ही खदखद व्यक्त करत उद्या येणाऱ्या सत्तेत राष्ट्रवादी येणार असेल तर तसली सत्ता आम्हाला नको अशी टीका भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी केली आहे. कार्यकर्त्यांच्या मनात काय असेल तर अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा, तसा निर्णय घ्या अशी मागणीच चौधरी यांनी केली आहे.

अधिक वाचा  सर्वाधिक घटनादुरुस्त्या काँग्रेस सरकारच्या काळात; भारतीय जनता पक्ष संविधान बदलणार नाही- माधव भांडारी

शिरूर लोकसभा मतदार संघाची भाजपची आढावा बैठक नुकतीत पार पडली. या बैठकीतला एक व्हीडिओ चांगलाच व्हायरल आहे. त्यामध्ये सुदर्शन चौधरी यांनी ही टीका केली आहे. कार्यकर्त्यांच्या मनात काय असेल तर अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा, तसा निर्णय घ्या अशी मागणीच त्यांनी केली. ते ऐवढ्यावरच थांबले नाहीत तर अजित पवार सत्तेत असतील तर असली सत्ता आम्हाला नको असेही ते थेट पणे बोलले.

ज्यांच्या विरोधात दहा दहा वर्षे संघर्ष केला त्या राष्ट्रवादीला सत्ता आणण्यासाठी आम्ही काम करणार नाही अशी भूमीका त्यांनी घेतली. राष्ट्रवादीला सत्तेत आणण्यासाठी आम्ही काम करायचं का? असा प्रश्नही त्यांनी केला. उद्या येणाऱ्या सत्तेत राष्ट्रवादी येणार असेल तर तसली सत्ता आम्हाला नको असेही ते यावेळी म्हणाले. ही भावना आपली नाही तर पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची ही इच्छा आहे की अजित पवार सत्तेत नकोत. पुण्या बरोबरच सोलापूरातही राष्ट्रवादीकडून भाजपला त्रास होत असल्याचे ते म्हणाले. भाजपच्या कार्यकर्त्यांना चिरडण्याचेच काम राष्ट्रवादीने आतापर्यंत केले आहे असेही ते म्हणाले. आता त्यांच्यासाठी सत्ता आम्ही आणणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा  लायन्स क्लब ऑफ पुणे विसडमच्या वतीने महिलांना 'सॅनिटरी पॅड'चे मोफत वाटप

सुदर्शन चौधरी यांनी आरोप केलेला हा व्हीडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. शिवाय त्यांनी हाच व्हीडिओ त्यांच्या फेसबूकवरी अपलोड केला आहे. हा व्हीडिओ समोर आल्यानंतर वरवर जरी महायुतीत सर्व काही ठिक आहे असे दर्शवले जात असले तरी स्थानिक पातळीवर सर्व काही ठिक नाही हेच दिसून येत आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांसाठी ही मोठी डोकेदुखी ठरणार आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love