आमदार जयंत आसगावकर यांच्या स्थानिक विकास निधीतून पुणे जिल्ह्यातील ४०० शाळांना प्रिंटर वाटप

पुणे-मुंबई शिक्षण
Spread the love

पुणे- पुणे शिक्षक मतदार संघाचे आमदार जयंत आसगावकर यांच्या स्थानिक विकास निधीतून पुणे जिल्ह्यातील ४०० शाळांना प्रिंटर वाटप करण्यात आले. सोमवार दिनांक १९-०६-२०२३ रोजी पुणे येथील अण्णाभाऊ साठे  सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी गृहराज्यमंत्री, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील होते. यावेळी ते म्हणाले,  जयंत आसगावकर सर आमदार झाल्यापासून शैक्षणिक क्षेत्रातील सर्व घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी, प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यांचा आमदार फंड ते फक्त आणि फक्त शिक्षणावरच खर्च करत असल्याने.पुणे शिक्षक मतदारसंघातील एकही शाळा वंचित राहणार नाही असेच चांगले काम करत आहेत. शिक्षणक्षेत्रात नवनवीन शिक्षक धोरणे येत आहेत त्यांचा सामना करण्यासाठी शिक्षकांनी तत्पर राहणे आवश्यक आहे. याप्रसंगी शिक्षक आमदार आसगावकर म्हणाले. १९८२ ची  जुनी पेन्शन लागू करण्यासाठी आमचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथे भव्य मोर्चा काढला.सातत्यांने जुनी पेन्शनसह शैक्षणिक क्षेत्रातील सर्वच घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असून, कामाबाबत कोणतीही कसर सोडणार नाही. होऊ घातलेल्या नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात शिक्षकांनी जागृत राहून, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कार्यशाळा घेणे गरजेचे आहे.

याकार्यक्रम प्रसंगी आमदार रवींद्र धंगेकर, मा. आमदार उल्हास पवार, मा. आमदार मोहन जोशी मा. आमदार अभय छाजेड, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळ तिवारी, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विभागाचे सहसचिव बंडू पोवार, संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर संघटनेचे राज्य समन्वयक शिवाजी खांडेकर,महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे, संस्थाचालक संघटनेचे उपाध्यक्ष आप्पासाहेब बालवडकर, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव शांताराम पोखरकर, माथाडी बोर्ड महामंडळाचे संचालक सुनील शिंदे,पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे मा. अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर,पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुजित जगताप व सचिव शिवाजी कामटे, महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर, पुणे जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष विनोद गोरे, पुणे जिल्हा शिक्षकेतर पतपेढीचे अध्यक्ष प्रसन्न कोथुळकर, गणपतराव तावरे, खलाटे सर , कोल्हापूरहुन संजय डी पाटील, संदीप पाथरे, शिवाजीराव लोंढे, विजय जाधव, श्रीधर गोंधळी, विश्वजीत शिंदे,एस एम नाळे,पी डी खाडे, सुभाष कलागते,व्ही के नाळे,देवाळकर सर,अत्तार सर,कोरवी सर,बी ए माने, दिपक घुंगुरकर,यांच्यासह पुणे जिल्ह्यातील मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *