महात्मा गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प्रियांका गांधी, ममता बॅनर्जी, संजय राऊत यांचे आक्षेपार्ह फोटो फेसबुवर अपलोड करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल


पुणे– महात्मा गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प्रियांका गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, संजय राऊत यांचे आक्षेपार्ह फोटो फेसबुवर अपलोड करून बदनामी केल्या प्रकरणी पाच जणांविरुद्ध सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

साक्षी पुनावाला, प्रविण पाटील, विकी चांगरे, विजय तिवलकर, प्रविण आर नेरकर अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.  याप्रकरणी अश्विनी पाटील (वय ३०, रा. आंबेगाव) यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपींनी फेसबुकवर राष्ट्रपिता महात्मा गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, प्रियांका गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, संजय राऊत यांचे आक्षेपार्ह फोटो फेसबुवर अपलोड केले. त्यावर आक्षेपार्ह मजकूर लिहून प्रसिद्ध करुन घटनात्मक पदाचा व प्रतिष्ठित राजकीय व्यक्तीमत्वांच्या लौकिकास बाधा आणणारे कृत्य करुन जाणून बुजून त्यांची बदनामी केली म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  कॉंग्रेसला जनतेच्या मनातून उतरवण्याचा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव- प्रवीण दरेकर