काँग्रेसचे गॅरंटी कार्ड साडेपाच लाख घरामध्ये पोहचणार : महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख मोहन जोशी यांची माहिती

Five and a half lakh Congress guarantee card will reach the house
Five and a half lakh Congress guarantee card will reach the house

पुणे -लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने देशवासियांना हमी देण्यासाठी तयार केलेल्या न्याय पत्रातील (जाहीरनामा) तरतुदींची माहिती देण्यासाठी तयार केलेले गॅरंटी कार्ड पुणे लोकसभा मतदार संघातील पाच ते साडेपाच लाख घरांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे प्रचार प्रमुख व माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.

   लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने युवक न्याय, महिला न्याय, शेतकरी न्याय, श्रमिक न्याय, भागीदारी न्याय आदी संकल्पनांतर्गत गॅरंटी कार्ड तयार केले आहे. यामध्ये प्रत्येक सुशिक्षित तरुणाला पहिली नोकरी मिळेपर्यंत एक लाख रुपये विद्यावेतन, प्रत्येक गरीब कुटुंबातील महिलेला दरवर्षी एक लाख रुपये, शेतकर्‍यांना कर्जमाफी व स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार शेतमालाला हमी, भावाची कायदेशीर गॅरंटी, मनरेगात दरदिवशी किमान 400 रुपये मजुरी, सामाजिक व आर्थिक समानतेसाठी जनगणना आदींचा समावेश आहे.

अधिक वाचा  एवढं गुडघ्याला बाशिंग बांधायचं काही कारण नाही : अजित पवारांनी सुनावले

काँग्रेस पक्षाचे हे गॅरंटी कार्ड शहरातील वीस लाख मतदारांपर्यंत पोहचवण्यात येणार आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या व इंडीया फ्रंट व मित्र पक्षांच्या कार्यकर्ते मतदार संघातील पाच ते साडेपाच लाख घरांमध्ये जाणार आहेत. या कामासाठी सर्व घटकपक्षांच्या कायर्र्कर्त्यांच्या बुथनिहाय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समितीच्या माध्यमातून मतदार संघातील दोन हजार बुथवर एकाच वेळी गॅरंटी कार्ड पाठवण्याची मोहीम शनिवारपासून (27 एप्रिल) हाती घेण्यात येणार आहे.  या गॅरंटी कार्डच्या खाली असलेल्या स्लिपवर मतदाराचे नाव व इतर माहिती भरून घेवून त्या स्लिप संकलीत केल्या जाणार आहेत. हे काम आठवड्यात पूर्ण करण्याचे नियोजन केले असल्याचे मोहन जोशी यांनी सांगितले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love