#धक्कादायक: नराधम बापानेच केले अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार


पुणे-पुण्यामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपल्या नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलींवर बापच लैंगिक अत्याचार करीत असल्याची फिर्याद पिडीत मुलीच्या आईने दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी या नराधम बापाला अटक केली असून नायालयाने त्याला १५ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुण्यातील कोंढवा भागात हा प्रकार घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस तपासात अत्यंत क्लेशदायक माहिती समोर आली आहे. हा नराधम बाप  आपल्या अल्पवयीन मुलींवर गेल्या चार वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत होता. कोंढवा परिसरात आरोपी पत्नी आणि चार मुलींसह वास्तव्यास आहे. त्याचा फर्निचरचा व्यवसाय आहे. आरोपी दोन्ही नऊ वर्षांच्या मुलीवर २०१६ पासून लैंगिक अत्याचार करत होता. या प्रकाराची माहिती पत्नीला मिळाली. त्यावर आरोपी पतीने पत्नीला कोणाला सांगितलं तर मुलींना ठार मारुन टाकेन अशी धमकी दिली. या भीतीपोटी पत्नी कोणाला सांगत नव्हती. पण त्याचवेळी हा संपूर्ण प्रकार एका वकिलाला समजला. त्यानंतर त्याने पीडित मुलीच्या आईला धीर देत तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आणलं. यावेळी तिने सगळा प्रकार सांगितला त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुणे पाेलीसांकडून काेबिंग ऑपरेशन: 414 गुन्ह्यात 443 आराेपींना अटक