कोरोनाच्या स्थितीवरून फडणवीस यांनी धरले राज्य सरकारला धारेवर; काय म्हणाले फडणवीस?


मुंबई- विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला अनेक जाब विचारात धारेवर धरले. मुख्यमंत्र्यांनी मुंबई बघायची आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुणे बघायचे, मग इतर ठिकाणी कोण लक्ष देणार? नागपूर औरंगाबादकडे कोण लक्ष देणार? मुंबई-पुण्याइतकंच तुमचं राज्य मर्यादित आहे का? असे सवाल करीत पुण्यातल्या जम्बो सेंटरमध्ये पांडुरंग रायकर या उमद्या पत्रकाराचा मृत्यू झाला  मात्र त्याची एन्ट्रीच केलेली नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

महाराष्ट्र सर्व गोष्टीत एक नंबर आहे. मात्र, कोरोनाच्या बाबतीत ते एक नंबरवर असावं असं आम्हाला वाटलं नव्हतं. पाच राज्य मिळून 70 टक्के मृत्यू आहेत, मात्र त्यात 50 टक्के महाराष्ट्राचे आहेत” असे फडणवीस म्हणाले. आपण ज्या प्रकारे विषय काढत आहात त्यावरून कोरोना संबंधित मागण्यांवर आपल्याला बोलायची इच्छा नसल्याचे दिसते आहे. राज्यातील अनेक विषय आहेत, ते आठ दिवस चर्चा केली तरी संपणार नाही परंतु आम्हालाही समजतं असा टोला त्यांनी लगावला.

अधिक वाचा  उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच राष्ट्रीय कार्यक्रम पुढे नेतायत

 कोरोनाच्या चाचण्या कमी केल्या जात आहेत आणि कोरोना बाधित रुग्ण संख्या कमी दाखवली जात आहे. मुंबईचा मृत्युदर आणि संसर्ग दर एकदा बघा संसर्गाचा दर जास्त आहे. महाराष्ट्रात सातत्याने 20 टक्के संसर्ग दर असून, देश आणि अन्य राज्यांच्या तुलनेत तो कितीतरी अधिक आहे. काल तर संसर्गाचा दर 25 टक्के होता. ही स्थिती भयावह आहे” असं फडणवीस म्हणाले.

डॉक्टरांचे पगार होत नाहीत, त्यांना कुठ्ल्याही सुविधा नाहीत. सरकारचं संपूर्ण महाराष्ट्राकडे लक्ष नाही, केवळ मुंबई- पुण्यापुरते राज्य सीमित आहे का असा सवाल त्यांनी केला. बीकेसीत उभारण्यात आलेल्या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये होणाऱ्या मृत्यूविषयी देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली. कोव्हिड सेंटर आहे की मृत्यूचं आगार, असा सवाल फडणवीस यांनी सरकारला केला.

अधिक वाचा  #Fadnavis Letter To Sharad Pawar: शरद पवारांच्या गुगलीवर फडणविसांचा टोला

जम्बो कोव्हिड सेंटर आहेत की, कुणाला तरी लाभ देण्यासाठी तयार केलेल्या फॅसिलिटी आहेत, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याच्यात काय भ्रष्टाचार झाला, हे वारंवार बाहेर आलं आहे. बीकेसी कोव्हिड सेंटरचा विचार केला, तर कालच वर्तमानपत्रात बातमी आली, गेल्या महिन्यात तिथला मृत्यूदर 37 टक्के होता. आलेला प्रत्येक तिसरा माणूस जर तिथे मृत्युमुखी पडत असेल, तर या कोव्हिड सेंटरमध्ये नेमकं चाललं काय आहे? असा प्रश्न विचारीत त्यांनी सरकारला धारेवर धरले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love