फडणवीस यांच्यामध्ये राष्ट्रीय नेतृत्व करण्याची शक्ति पण.. संजय राऊत


पुणे- राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ही तरुण आहेत. त्यांचा अनुभवही वाढत चालला आहे. त्यांचे भवितव्य उज्वल असून त्यांच्यामध्ये राष्ट्रीय नेतृत्व करण्याची शक्ति आहे अशी स्तुति करतानाच अचानक गेलेल्या सत्तेच्या धकयातून स्वत:ला सावरले पाहिजे असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते.

राऊत म्हणाले, मुख्यमंत्री, पंतप्रधान यांचा विरोधी पक्ष नेत्यांशी संवाद असलाच पाहिजे. ती आपल्या राजकारणाची परंपरा आहे. तरच राष्ट्र आणि राज्य पुढे जाऊ शकेल. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चांगला संवाद आहे असे सांगून राऊत म्हणाले, राज्याच्या प्रश्नांवरून जास्त राजकारण होता काम नये. पूर्वी या गोष्टी घडत होत्या, परंतु त्याची शृंखला अलीकडच्या राजकारणात तुटल्यासारखी वाटते आहे. 105 आमदार निवडून येऊनही सत्ता गेली म्हणून सरकार बरोबर दुश्मनी करणं योग्य नाही, अशी दुश्मनी राज्याबरोबर केल्यासारखी आहे. हे राज्य आमचं आहे अशी भावना विरोधकांची असायला हवी. टीका करणं हे विरोधकांचे कामच आहे परंतु राज्याशी बेइमानी करू नका असे सांगून राऊत म्हणाले, सत्तेचा अमरपट्टा कोणी घेऊन आलेले नाही. फडणवीस अजूनही सत्ता गेल्याच्या धक्क्यातून बाहेर आलेले नाहीत. त्यांनी स्वत:ला सावरले पाहिजे. त्यांचे भवितव्य उज्वल आहे.

अधिक वाचा  देवेंद्र फडणवीस म्हणतात मोठा बॉम्ब फुटेल मात्र, तसं कधीही होत नसतं - रोहित पवार

दरम्यान, राज्यात आघाडी सरकार होणार नाही असं  काही लोकांना वाटत होतं. परंतु, माझ्यासारख्या लोकांना निवडणुकीपूर्वीच हे सरकार होणार ही माहिती होतं असे सांगून राऊत म्हणाले, 15 दिवसात सरकार कोसळेल यासाठी पैंजा लागल्या होत्या. परंतु हे सरकार पूर्ण ताकदीनिशी चालेल आणि चार वर्षे पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तेजस्वी यादव मुख्यमंत्री झाल्यास आश्चर्य वाटायला नको

विरोधी पक्षाचे लोक सभागृहात असायलाच पाहिजे. एक चांगला विरोधी पक्ष असणं ही संसदीय लोकशाही प्रक्रियेतील महत्वाची गोष्ट आहे. मात्र, दुर्दैवाने जे आपल्या विचारांचे नाही त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही अशी स्थिति निर्माण झाली असून ती देशाला आणि राज्याला घातक आहे असे राऊत म्हणाले. राजकीय दहशदवाद विरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे असे सांगत बिहारची निवडणूक ‘फेअर’ होईल याबाबत शंका असल्याचे त्यांनी नमूद केले. एका तरुण नेत्याच्या पाठीमागे इन्कम टॅक्स, सीबीआयचा  ससेमिरा मागे लावला जात आहे. मात्र, हाजोरोंच्या संख्येने सभा घेणारा तेजस्वी यादव हा तरुण बिहारचा मुख्यमंत्री झाल्यास आश्चर्य वाटायला नको असे ते म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love