पुणे रेल्वे स्थानकात बॉम्ब सदृश वस्तु आढळल्याने खळबळ

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

पुणे: पुणे रेल्वे स्थानकात शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास बॉम्बसदृश वस्तू  आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. ही माहिती मिळताच पोलिस आणि बॉम्ब शोधक पथक स्थानकावर तत्काळ दाखल झाले. पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानक पूर्ण रिकामे केले होते, तसेच पुण्याकडे येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्याही  थांबविण्यात आल्या होत्या. दरम्यान, प्रथमदर्शनी तरी या वस्तू जिलेटीन असल्याचे वाटत नाही. पण बॉम्बशोधक पथकाकडून या वस्तूंची तपासणी सुरु असल्याचे पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. या घटनेनंतर पुणे पोलीस स्थानकाच्या परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

पुणे स्थानकावर शुक्रवारी नेहमी प्रमाणे वर्दळ असतांना बॉम्बसदृष्य वस्तू सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही बॉम्ब सदृष्य वस्तू फटाक्यासारखी आहे अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, ही वस्तू  स्थानकावर कुणी आणली ? या मागे काही घातपात करण्याचा हेतू होता का ? या प्रश्नांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान बॉम्ब शोधक पथकाने स्थानकाच्या गेट समोरील एक फटाका सदृष्यवस्तू निकामी  केली आहे.

तब्बल तासाभराच्या तपासणीनंतर रेल्वे स्थानकावर सापडलेल्या या वस्तू बॉम्ब नसल्याचे स्पष्ट झाले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, पुणे रेल्वे स्थानकावर कोणताही बॉम्ब किंवा स्फोटके आढळलेली नाहीत. फलाट क्रमांक १ आणि २ पुन्हा एकदा रहदारीसाठी खुले करण्यात आले असून रेल्वे वाहतूकही पूर्ववत सुरु झाली आहे. ज्या वस्तू मिळाल्या आहेत, त्यांची तपासणी सुरु आहे. यामध्ये कोणतेही सर्किट किंवा स्फोटक घटक आढळून आलेले नाहीत. रेल्वे पोलीस आणि पुणे पोलिसांकडून याचा समांतररित्या तपास केला जाईल, अशी माहिती अमिताभ गुप्ता यांनी दिली.

दरम्यान, वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी  या घटनेची गांभिर्याने दखल घेतली असून यंत्रणांना हायअलर्ट मोड वर ठेवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी दोघांनी रेल्वे स्थानक उडवून देण्याची धकमी दिली होती. तसेच स्थानक परिसरात बॉम्ब असल्याचे सांगत त्या जागा सांगण्यासाठी ७ कोटी रुपयांची मागणी केली होती. पुणे पोलिसांनी त्या दोघांना अटक केली होती.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *