Excise department suspends license of L-3 bar where drug party took place

ड्रग पार्टी झालेल्या एल-३ बारचा परवाना उत्पादन शुल्क विभागाकडून निलंबीत

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

पुणे( प्रतिनिधी) -पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील लिक्विड लिझर लाऊंज (एल- ३) या ठिकाणी २३ जून रोजी मध्यरात्री ड्रग व मद्यपार्टी झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर याप्रकरणात पोलीसांनी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करुन आठजणांना अटक केली आहे. तर, शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील दोन बीट मार्शल, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक पोलीस निरीक्षक यांचे निलंबन झाले असून हलगर्जीपणामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागातील एक निरीक्षक व एक दुय्यम निरीक्षक यांचे देखील निलंबन करण्यात आले आहे. आता याप्रकरणात संबंधित एल -३ ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारुसाठा जप्त केल्याने व हॉटेल रेनबोचा परवानाकक्षाचा परवाना रद्द केला असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सी.बी.राजपुत यांनी दिली आहे.

राजपुत म्हणाले, संबंधित एल-३ हॉटेल मधील प्रकार उघडकीस आल्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली. सदर पार्टीत ड्रगज सेवेन केल्याबाबत सत्यता पडताळणी करण्यासाठी पोलीसांचा स्वतंत्र तपास सुरु असून घटनास्थळावरील सीसीटीव्हीचा डीव्हीआर पोलीसांनी तपासणीसाठी ताब्यात घेतला आयहे. सदर हॉटेलची तपासणी केली असता त्यात मोठया प्रमाणात विनापरवाना मद्यसाठा मिळून आला आहे. याप्रकरणात महराष्ट्र दारुबंदी कायदानुसार गुन्हा दाखल करुन सहाजणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण तीन लाख रुपये किंमतीचे २४१ लिटर विदेशी मद्य व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. सदर इमारतीतील तळमजला व पहिला मजल्यावर संतोष कामठे यांच्या नावाने हॉटेल रेनबोमध्ये  मद्यविक्री परवानाकक्ष अनुज्ञप्ती मंजुरी आहे. परंतु सदर परवानाकक्षात पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी छुपा मार्ग काढून अनुज्ञप्तीच्या मंजुर नकाशात बदल केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे याबाबत सखोल निरीक्षण केले असता, या परवाना कक्षात गंभीर स्वरुपाची विसंगती आढळून आल्याने तसेच परवाना कक्षात अंर्तगत बदल केल्यामुळे सदर परवाना कक्षाचा परवाना  जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशानुसार तात्काळ रद्द करुन त्याला सील करण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माध्यमातून परवानाकक्षात विसंगती नोंदविलेले एकूण ६९ अनुज्ञप्ती पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात आले असून त्यात सहा अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहे. पुणे जिल्हयात मोठया प्रमाणात होणाऱ्या अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री तसेच परराज्यातील मद्य/ अवैध ढाबे, अवैध ताडी विक्री विरुध्द कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण १४ नियमित पथके व एकूण तीन विशेष पथक तयार केली असून त्याद्वारे कारवाई करण्यात येत आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *