पुणे–पुणे (Pune) शहरातील शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो (Shivajinagar_Hinjvadi Metro) मार्गिकेचे काम सुरू असताना बाणेर (Baner) परिसरात खोदकामात जुने हातबॉम्ब (hand grenade) सापडल्याची घटना उघडकीस आली आहे. (found old hand grenades in Baner area)
हिंजवडी मेट्रो (Hinjvadi Metro) मार्गिकेवर खांब उभे करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. बाणेर(Baner) परिसरात खोदकाम सुरू असताना सोमवारी (४ डिसेंबर) दुपारी बाराच्या सुमारास जुने हातबॉम्ब (हँड ग्रेनेड) सापडले. मेट्रो कामगारांनी अधिकाऱयांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर चतु:शृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्वरित बॉम्ब शोधक नाशक पथकाला (बीडीडीएस) कळवले. बॉम्ब शोधक नाशक पथकातील (Bomb disposal squad) अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱयांनी तातडीने बॉम्ब सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या. बॉम्ब जिवंत आहे का नाही, याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी यंत्राचा वापर केला. हात बॉम्ब सुरक्षितस्थळी हलवून निकामी करण्यात आला आहे. हात बॉम्ब ब्रिटीशकालीन असल्याची शक्मयता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे सदर भागातील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती.